विजयवाडा : एका उद्योगपतीला वाचवण्यासाठी मुंबईतील अभिनेत्रीवर खोटे गुन्हे दाखल करुन तिला अटक करुन त्रास दिल्याबद्दल तीन आयपीएस अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आलं आहे. आंध्र प्रदेश सरकारनं ही कारवाई केली आहे. कारवाई करण्यात आलेले अधिकारी हे वरिष्ठ अधिकारी असून त्यांनी ड्युटीवर असताना आपल्या अधिकारांचा गैरवापर केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.