Anil Antony Joins BJP: माजी संरक्षणमंत्री ए. के. अँटनी यांचे चिरंजीव अनिल अँटनी यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. आता ए. के. अँटनी यांनीही आपल्या मुलाच्या भाजप प्रवेशावर प्रतिक्रिया दिली आहे.
अनिल यांच्या भाजप प्रवेशाच्या निर्णयाचा मला धक्का बसला आहे. हा अत्यंत चुकीचा निर्णय आहे. एकता आणि धार्मिक सलोखा हा भारताचा पाया आहे. तसेच नेहरू घराण्याशी माझी निष्ठा कायम राहील.
केरळ काँग्रेसने म्हटले की, आजचा दिवस विश्वासघाताचा आहे, अनिल अँटनी यांनी ईस्टर फेस्टिव्हल 2023 पूर्वी आपल्या वडिलांचा विश्वासघात केला आहे.
मीडियाशी बोलताना ए. के. अँटनी म्हणाले की, 2014 नंतर मोदी सरकार सत्तेवर आल्यापासून ते पद्धतशीरपणे विविधता आणि धर्मनिरपेक्षता कमकुवत करत आहेत. भाजपचा केवळ एकवाक्यतेवर विश्वास आहे. ते देशाची घटनात्मक मूल्ये नष्ट करत आहेत.
अनिल अँटनी यांनी भाजपमध्ये प्रवेश करत काँग्रेसवर निशाणा साधला. एका कुटुंबासाठी नव्हे तर देशासाठी काम करणे हा आपला धर्म असल्याचे ते म्हणाले. 'धर्मो रक्षती रक्षिता' या लोकप्रिय संस्कृत श्लोकाचा उल्लेख करताना ते म्हणाले, 'आजकाल काँग्रेस नेते आणि कार्यकर्त्यांना वाटते की, एका कुटुंबासाठी काम करणे हाच आपला धर्म आहे. देशासाठी काम करणे हा माझा धर्म आहे. "
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.