न्युयॉर्क : विज्ञानाच्या (science and technology) जगात शास्त्रज्ञांनी (scientist) एक असा आविष्कार घडवून आणला आहे, ज्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. वैद्यकीय क्षेत्रात वैज्ञानिकांनी क्रांतिकारक पाऊलं उचलली असून मिळालेल्या माहितीनुसार गंभीर आजाराने पीडित मानवी शरीरामध्ये चक्क डुक्कराच्या हृदयाचे (transplanted pig heart into human body) प्रत्यारोपण केले आहे, जाणून घ्या सविस्तर..
वैद्यकीय इतिहासात प्रथमच
अमेरिकेतील डॉक्टरांनी विज्ञानाचा चमत्कार केला आहे. यूएसमधील शल्यचिकित्सकांनी एका डुकराचे हृदय 57 वर्षीय पुरुषामध्ये यशस्वीरित्या प्रत्यारोपित केले आहे. वैद्यकीय इतिहासात हे प्रथमच घडले आहे. या चमत्कारी प्रयोगामुळे येणाऱ्या काळात अवयवदात्यांचा तुटवडा दूर करता येईल. अनेकदा अवयव दाता उपलब्ध नसल्यास लोकांचा जीव धोक्यात येतो. पण आता ही समस्या दूर होणार आहे.
वैद्यकीय क्षेत्रात क्रांती
युनिव्हर्सिटी ऑफ मेरीलँड मेडिकल स्कूलने एक निवेदन जारी करून याबाबत खुलासा केला आहे. वैद्यकीय इतिहासात नवा अध्याय सुरू करणारे हे प्रत्यारोपण शुक्रवारी करण्यात आले. यापुढेही रुग्णावर उपचार करणे शक्य होईल की नाही. हे त्या रुग्णाच्या प्रकृतीवरून समजणार आहे, जरी रुग्ण बरा होत असला तरी यामुळे काहीतरी चांगले नक्कीच होण्याची आशा व्यक्त करण्यात येत आहे. डॉक्टर रुग्णाच्या प्रकृतीवर सतत लक्ष ठेवून असतात. जगभरातील डॉक्टरांसाठीही ही मोठी आशा आहे.
रुग्णाकडे होते दोनच पर्याय
डेव्हिड मेरीलँडमध्ये राहतो. डेव्हिडने सांगितले की, त्याच्याकडे दोनच पर्याय आहेत, एकतर तो मरावा किंवा प्रत्यारोपणासाठी तयार व्हावे. डेव्हिडने आशेने सांगितले की त्याला जगायचे आहे. हे प्रत्यारोपण म्हणजे अंधारात बाण सोडल्यासारखे होते. गेल्या अनेक महिन्यांपासून डेव्हिड हार्ट-लंग बायपास मशीनच्या मदतीने अंथरुणावर पडून आहे. पण आता लवकरच ते अंथरुणातून उठतील अशी आशा त्यांना वाटत आहे.
ऑर्गन डोनर ताण दूर होईल
पारंपारिक प्रत्यारोपण शक्य नसल्याने यूएस अन्न आणि औषध प्रशासनाने या आपत्कालीन प्रत्यारोपणाला शेवटचा प्रयत्न म्हणून मान्यता दिली. डेव्हिडमध्ये डुकराचे हृदय रोपण करणारे सर्जन बार्टले ग्रिफिथ यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले की ही यशस्वी शस्त्रक्रिया आहे. त्यामुळे अवयवदात्यांचा तुटवडा नक्कीच दूर होईल
आणखी एक चमत्कार
यापूर्वी ऑक्टोबर 2021 मध्ये, एका मानवावर यशस्वी डुकराचे मूत्रपिंड प्रत्यारोपण झाले होते. हा चमत्कार अमेरिकन डॉक्टरांनीही करून दाखवला. किडनी निकामी झालेल्या जगभरातील लाखो लोकांसाठी हे प्रत्यारोपण आशादायी आहे. हा पराक्रम न्यूयॉर्क शहरातील NYU लँगोन हेल्थ मेडिकल सेंटरमधील शल्यचिकित्सकांनी केला आहे. येथील सर्जन बऱ्याच काळापासून या दिशेने काम करत होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.