मृत्यूनंतर तरी नेताजींना त्यांच्या देशात आणा; अनिता बोस यांचे भावनात्मक आवाहन

विनोद राऊत,सकाळ वृत्तसेवा
Anita Bose
Anita Boseesakal
Updated on

मुंबई : नेताजींच्या मृत्युला ७७ वर्षे लोटून गेली आहे, मात्र जपानमधील (Japan) त्यांच्या अस्थी भारतात आणणे शक्य झाले नाही. नेताजींची मुलगी म्हणून मला नेताजींच्या अस्थी भारतात आणताना बघायचे आहे. माझ्या वडिलांनी आपल्या देशावर जिवापाड प्रेम केले. देशाला स्वतंत्र होताना (India freedom) पाहायचे त्यांचे स्पप्न होते. मात्र त्यांना ते पाहता आले नाही. मात्र मृत्यूनंतर तरी ते त्यांच्या प्राणप्रिय देशात पोहोचले पाहिजेत, अशा भावना नेताजी सुभाष चंद्र बोस (Netaji Subhash chandra bose) यांची एकुलती एक मुलगी अनिता बोस (Anita bose) यांनी व्यक्त केली आहे. २३ जानेवारीला नेताजी सुभाष चंद्र बोस यांची १२५ वी जंयती साजरी होणार आहे. या पार्श्वभूमीवर जर्मनीत राहणाऱ्या अनिता बोस यांच्याशी 'सकाळ'ने एक्लुझिव्ह संवाद साधला होता. (Anita bose emotional appeal about netaji subhash chandra bose)

Anita Bose
दीड लाखाची एमडी पावडर जप्त; भिवंडीत कथित पत्रकाराला अटक

नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या स्वातंत्र्यलढ्यातील योगदानाकडे जाणीपुर्वक दुर्लक्ष केल्याची भावना अनिता बोस यांनी यावेळी व्यक्त केली. काँग्रेसने राजकीय डावपेचाचा एक भाग म्हणून देशाच्या स्वातंत्र्याचे संपुर्ण अहिंसात्मक आंदोलनाला दिले. मात्र आझाद हिंद सेनेच्या लष्करी उठावामुळे ब्रिटीश सरकार हादरले होते, त्यामुळे यापुढे भारताला ताब्यात ठेवणे अशक्य असल्याची जाणीव ब्रिटीश सरकारला झाली होती. असा दावा अनिता बोस यांनी केला. या दाव्याला पृष्टी देणारे अंसख्य कागदपत्र सार्वजनिक आहेत असही त्या म्हणाल्या.

प्रजासत्ताक दिनाच्या देखाव्यावरुन उडालेल्या वादाबद्दल अनिता बोस यांनी नाराजी व्यक्त केली. नेताजी भारताचे थोर सुपूत्र होते मात्र पश्चिम बंगालचे ते अत्यंत लाडके होते, ही बाब विसरायला नको अस त्य़ा म्हणाल्या. नेताजींच्या मृत्यूच्या वादाला आता मूठमाती द्यावी असं आवाहन अनिता बोस यांनी केले. नेताजींच्या मृत्यूपेक्षा त्यांचे जीवनकार्य, देशप्रेमाचा विचार कितीतरी मोठा आहे, त्याची आठवण ठेवण्याची गरज असल्याचे अनिता बोस म्हणाल्य़ा.

महात्मा गांधी धुर्त व्यक्ती

महात्मा गांधी आणि जवाहरलाल नेहरु यांच्यासंदर्भात त्यांनी आपली मते व्यक्त केली. नेताजी आणि महात्मा गांधीचे मतभेद जगजाहिर होते. मात्र तरीही नेताजींना गांधीजीबद्दल अतिव आदर होता. मात्र गांधीजी एक धुर्त राजकारणी होते, त्यांच्या विचारांशी सहमत नसणाऱ्यांना ते धडा शिकवायचे. याउलट नेताजी सरळमार्गी आणि स्पष्टवक्ते होते.याची आठवण अनिता बोस यांनी करुन दिली. जवाहरलाल नेहरु यांच्यापेक्षा नेताजींचे योगदान मोठे होते याची जाणीव देशवासीयांना आहे, असे स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केलं.

(अनिता बोस यांची संपुर्ण मुलाखत वाचा, 'अवतरण'पुरवणीत)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()