गुलाम नबी आझाद यांच्या राजीनाम्यानंतर काँग्रेसला आणखी एक मोठा धक्का बसलाय.
गुलाम नबी आझाद (Ghulam Nabi Azad) यांच्या राजीनाम्यानंतर तेलंगणात काँग्रेसला (Telangana Congress) आणखी एक मोठा धक्का बसलाय. पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी राज्यसभा खासदार एमए खान (MA Khan) यांनी राजीनामा दिलाय.
आझाद यांच्याप्रमाणंच त्यांनी राहुल गांधींवर जोरदार निशाणा साधलाय. पाच पानी राजीनामा पत्रात आझाद यांनी राहुल गांधींचा (Rahul Gandhi) उल्लेख गैर-गंभीर नेता, असा केलाय. त्याचवेळी एमए खान यांनीही अशीच प्रतिक्रिया दिलीय. ते म्हणाले, "राहुल गांधींनी पक्षाच्या उपाध्यक्षपदाची सूत्रं हाती घेतल्यानंतरच काँग्रेसला त्रास सहन करावा लागलाय." वृत्तसंस्था एएनआयनं खान यांच्या हवाल्यानं म्हटलंय की, "ब्लॉक लेव्हलपासून बूथ लेव्हलपर्यंत त्यांची विचार करण्याची पद्धत वेगळी आहे. आजपर्यंत त्यांच्याशी आमचं कधी जुळत नाही."
खान पुढं म्हणाले, पक्षाला अनेक दशकं मजबूत करणारे पक्षाचे सर्व दिग्गज आता पक्ष सोडत आहेत. ज्येष्ठ सदस्यांशी कसं वागावं, हे राहुल गांधींना अजूनही कळत नाहीय. परिस्थिती लक्षात घेता, माझ्याकडं राजीनामा देण्याशिवाय कोणताही पर्याय नव्हता, असं त्यांनी शेवटी नमूद केलं. दरम्यान, शुक्रवारी आझाद यांच्या राजीनाम्यानंतर जम्मू-काश्मीरमधील पाच नेत्यांनीही माजी मुख्यमंत्र्यांना पाठिंबा देत पक्ष सोडलाय.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.