Kuno National Park: कुनो नॅशनल पार्कमध्ये आणखी एका चित्त्याचा मृत्यू , 4 महिन्यात 9वी घटना

cheetah
cheetah sakal
Updated on

Madhya Pradesh Kuno National Park: मध्य प्रदेशातील  कुनो नॅशनल पार्कमध्ये आणखी एका चित्याचा मृत्यू झाला आहे. मार्च महिन्यापासून हे ९ वे प्रकरण आहे. राज्याच्या वनविभागाने बुधवारी प्रसिद्ध केलेल्या निवेदनात ही माहिती दिली.

निवेदनात म्हटले आहे की, मादी चित्तापैकी एक धत्री (टिबिलिसी) आज सकाळी मृतावस्थेत आढळून आली. मृत्यूचे कारण शोधण्यासाठी पोस्टमॉर्टम केले जात आहे.

१४ चित्त्यांपैकी सात नर आणि सहा मादी कुनो नॅशनल पार्कमध्ये ठेवण्यात आले आहेत. कुनो वन्यजीव पशुवैद्यकांची एक टीम आणि एक नामिबियन तज्ञ नियमितपणे त्यांच्या आरोग्यावर लक्ष ठेवतात. मात्र एक मादी चित्ता मृतावस्थेत आढळली.

cheetah
Nitin Gadkari On Road Accident: देशात दरवर्षी ५ लाख अपघात तर १.५ लाख लोकांचा मृत्यू; गडकरींनी व्यक्त केली खंत

मध्य प्रदेशातील कुनो नॅशनल पार्कमध्ये गेल्या जुलैच्या मध्यात नर चित्ता सूरजचा मृत्यू झाला होता. वन अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली होती. यावर्षी मार्च महिन्यापासून श्योपुर जिल्हा उद्यानात मृत्यूमुखी पडलेल्या चित्त्यांची संख्या ९ वर गेली आहे. (latest marathi news)

१ जुलै रोजी देखील एका नर चित्ताचा मृत्यू झाला होता. नर चित्ता तेजस हा निरीक्षण पथकाला जखमी अवस्थेत आढळून आला होता. यानंतर त्याच्यावर उपचार करण्यात आले मात्र त्याचे प्राण वाचू शकले नाहीत. तेजसच्या मृत्यूनंतर कुनो नॅशनल पार्कमध्ये फक्त ४ चित्ता आणि ३ शावक उरले होते. तर आता आणखी एका चित्त्याचा मृत्यू झाला आहे.

cheetah
Rahul Gandhi : भ्रष्टाचारावर तडजोड होणार नाही; कर्नाटकमधील मंत्र्यांसोबतच्या बैठकीत राहुल गांधींची भूमिका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.