India's most Wanted Terrorists in Pakistan: पाकिस्तानातून सलग दोन दिवसांत दोन कट्टर दहशतवाद्यांच्या मृत्यूच्या बातम्या समोर येत आहेत. शनिवारी, पाकिस्तानमधील मोस्ट वॉन्टेड दहशतवादी कमांडरपैकी एक शेख जमील-उर-रेहमान, खैबर पख्तूनख्वामधील अबोटाबाद येथे रहस्यमय परिस्थितीत मृत आढळून आला. रहमान युनायटेड जिहाद कौन्सिलचा (UJC) सरचिटणीस आणि तहरीक-उल-मुजाहिदीनचा (TuM) अमीर होता. तो काश्मीरमधील पुलवामा येथील रहिवासी होता.
ऑक्टोबर 2022 मध्ये गृह मंत्रालयाने त्याला दहशतवादी घोषित केले होते. त्यांच्या मृत्यूचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. एका अधिकाऱ्याने सांगितले की, तो जम्मू-काश्मीरमधील अनेक दहशतवादी हल्ल्यांमध्ये सामील होता आणि त्याने पाकिस्तानी गुप्तचर संस्था ISI सोबतही काम केले होते. आम्ही तुम्हाला सांगतो की, अलीकडच्या काही महिन्यांत, पाकिस्तानमध्ये अनेक दहशतवादी मारले गेले आहेत किंवा गूढ परिस्थितीत मृत सापडले आहेत.
जम्मू आणि काश्मीरचे पाकिस्तानमध्ये विलीनीकरण आणि पॅन-इस्लामी ओळख वाढवण्याच्या उद्देशाने TUM ची स्थापना करण्यात आली. 1991 मध्ये त्याचा संस्थापक युनूस खान एका चकमकीत मारला गेल्याने या गटाला सुरुवातीच्या काळात मोठा धक्का बसला. त्याच वेळी, जम्मू-काश्मीरमध्ये कार्यरत असलेल्या सर्व दहशतवादी संघटनांना एका व्यासपीठावर आणण्यासाठी UJC हा पाकिस्तानस्थित जिहादी संघटनांचा एक गट होता. यामध्ये लष्कर-ए-तैयबा, जैश-ए-मोहम्मद, अल बद्र, हिजबुल मुजाहिदीन आणि इतर अनेक दहशतवादी संघटनांचा समावेश होता.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, UJC इस्लामिक स्टेटपासून प्रेरित JK-IS आणि अल-कायदाची शाखा अन्सार गजवत-उल-हिंद यांसारख्या दहशतवादी संघटनांशी संघर्ष करत आहे.
गुप्तचर सूत्रांनी सांगितले की TuM ला पाकिस्तान, बांगलादेश, सौदी अरेबिया, ब्रिटन, अमेरिका आणि आखाती देशांकडून निधी मिळाला आहे. त्याचा निधी प्रामुख्याने अहल अल-हदीस परंपरेचे सदस्यत्व घेणाऱ्या संस्थांकडून येत आहे. यासंबधीचे वृत्त एका हिंदी वृत्तवाहिनीने दिले आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.