CAA विरोधी आंदोलन: अखिल गोगोईंची UAPA कायद्यातून निर्दोष मुक्तता


Akhil Gogoi
Akhil Gogoi
Updated on

गुवाहाटी : सुधारित नागरिकत्व कायद्याच्या विरोधात आंदोलन केल्या प्रकरणी Unlawful Activities (Prevention) Act, 1967 कायद्याअंतर्गत अटकेत असलेले आमदार अखिल गोगोई यांना आता राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (NIA) न्यायालयाने दिलासा दिला आहे. NIA न्यायालयाने CAA विरोधातील आंदोलनामध्ये त्यांच्यावर ठेवलेल्या सर्व आरोपांमधून त्यांना मुक्त केलं आहे. विशेष NIA न्यायालयाने त्यांना आणि त्यांच्या अन्य तीन साथींना डिसेंबर 2019 मध्ये आसाममध्ये सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधातील हिंसक आंदोलनासाठी जबाबदार ठरवत UAPA कायद्याअंतर्गत अटक केली होती. दहशतवादी कारवायांना प्रतिबंध घालण्यासाठी म्हणून UAPA कायदा ओळखला जातो. गोगोई हे आसाममधील शिवसागर मतदारसंघातून अपक्ष आमदार आहेत.


Akhil Gogoi
Zydus Cadila ची लहान मुलांसाठी लस; DCGI कडे मागितली मंजुरी

UAPA अंतर्गत त्यांच्यावरचे सर्व आरोप काढून टाकण्यात आले आहेत. आज त्यांची तुरुंगातून सुटका होऊ शकते. 22 जून रोजी अपक्ष आमदार गोगोई आणि त्यांचे दोन अन्य सहकारी पहिल्या प्रकरणातून आरोपमुक्त झाले होते.


Akhil Gogoi
फूड डिलिव्हरीसाठी आलेल्या ढाबा मालकाच्या मुलाचा डॉक्टरवर बलात्कार

NIA चे विशेष न्यायाधीश प्रांजल दास यांनी चांदमारी प्रकरणात अखिल गोगोई आणि त्याचे तीन सहकारी धैर्य कोंवर, मानस कोंवर आणि बिटू सोनोवाल यांच्यावर माओवाद्यांशी संबंध असल्याचा आरोप लावण्यात आला नाही. कोर्टाने सुटकेचा आदेश कोर्टाला पाठविल्यानंतर अखिल गोगोई यांना नंतर सोडण्यात येईल. त्याचे तीन सहकारी आधीच जामिनावर सुटले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.