Anti Drone System: अयोध्येतील राम मंदिराला इस्रायल पुरवणार सुरक्षा कवच; अशी असेल 'अँटी ड्रोन सिस्टिम'

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ही सुरक्षा यंत्रणा बसवण्याचे आदेश दिले आहेत.
Ayodhya Security
Ayodhya SecurityeSakal
Updated on

नवी दिल्ली : अयोध्येतील राम मंदिराला इस्रायल अँटी ड्रोन सिस्टिमचं सुरक्षा कवच पुरवणार आहे. या सुरक्षा सिस्टिममध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ही सुरक्षा यंत्रणा बसवण्याचे आदेश दिले आहेत. त्यासाठी युपी पोलिसांनी हे सुरक्षा यंत्रणा खरेदी प्रक्रिया पूर्ण केली आहे. (Anti Drone System security cover to Ayodhya Ram temple will provide by Israel)

Ayodhya Security
Chhagan Bhujbal: "सरकार किंवा पक्षातून काढलं तरी ओबीसींसाठी लढत राहणार"; भुजबळांचं मोठं विधान

युपीमध्ये पहिल्यांदाच बसवणार अँटिड्रोन सिस्टिम

उत्तर प्रदेशात पहिल्यांदाच अशा प्रकारे अँटी ड्रोन सिस्टिम अयोध्येतील राम मंदिर परिसरात तैनात केली जाणार आहे. अनेक टप्प्यातील परीक्षणानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. २२ जानेवारी २०२४ रोजी जेव्हा रामलल्लाचा प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडला तेव्हा देखील या अँटी ड्रोन सिस्टिमचा वापर करण्यात आला होता.

उत्तर प्रदेश पोलिसांनी राष्ट्रीय सुरक्षा गार्ड, विशेष सुरक्षा समूह आणि इतर सुरक्षा बलांच्या विशेष समन्वयातून मागवण्यात आलं होतं. यापूर्वी दिल्लीत झालेल्या जी २० संमेलनच्या सुरक्षेसाठी अँटिड्रोन सिस्टिमचा वापर केला होता. (Latest Marathi News)

Ayodhya Security
Ram Temple Ayodhya Security: ATS कमांडोच्या सुरक्षेखाली अयोध्या! 360 डिग्री सुरक्षा कव्हरेजसाठी अँटी-माइन ड्रोन तैनात

काय आहेत याची वैशिष्ट्ये?

अँटी ड्रोन सिस्टिम ही मानवविहरहित हवाई उपकरणांना रोखण्यासाठी तयार केली जाते. विशेष रेडियो फ्रिक्वेन्सीच्या माध्यमातून ते शत्रूच्या ड्रोनची ओळख पटवतं. त्यानंतर संशयास्पद हालचालींचा टिपत सुरक्षा रक्षकांपर्यंत ते पोहोचतं. त्यानंतर ते पाडलं जातं. सुमारे पाच किमीपर्यंत शत्रूच्या ड्रोनचा पत्ता लावू शकतं. तसेच ते शोधून निष्क्रिय करु शकतं. उत्तर प्रदेश सरकारनं अशा प्रकारचे दहा सुरक्षा सिस्टम खऱेदी केली आहेत. (Marathi Tajya Batmya)

Ayodhya Security
Pariksha Pe Charcha: "मुलांना इतरांची उदाहरणं देऊ नका"; PM मोदींनी 'परीक्षा पे चर्चा'मध्ये केलं पालकांना आवाहन

स्नायपर्सही असणार तैनात

अँटि ड्रोन सिस्टिमसोबतच स्नायपर्स देखील राम मंदिराच्या परिसरात तैनात केले जाणार आहेत. या स्नायपर्सना ड्रोन्सना पाडण्याचं प्रशिक्षण दिलं जाणार आहे. अशा प्रकारच्या ड्रोन्सला ते पाडणार आहेत ज्यांना लेझर आणि तांत्रिक उपकरणंही पाडणं अशक्य आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.