Antrix Devas हा फसवणुकीचा करार; अर्थमंत्र्यांचा UPA सरकारवर गंभीर आरोप

Antrix Devas हा फसवणुकीचा करार; अर्थमंत्र्यांचा UPA सरकारवर गंभीर आरोप
Updated on

नवी दिल्ली : अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman Minister of State for Finance of India) यांनी काँग्रेसवर निशाणा साधला आहे. काँग्रेसच्या राजवटीत केवळ संसाधनांचा गैरवापर झाला असल्याचं त्यांनी म्हटलंय. निर्मला सीतारामन म्हणाल्या की, तत्कालीन दूरसंचार मंत्री कपिल सिब्बल यांनी याबाबत पत्रकार परिषद घेतली होती, मात्र त्यांच्या बाजूने या विषयावर कॅबिनेट नोटचाही उल्लेख करण्यात आलेला नाही. देवास-अँट्रिक्स प्रकरणावर अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी भाष्य करत तत्कालिन काँग्रेस सरकारवर टीका केली आहे.

त्या म्हणाल्या की, देवास-अँट्रिक्स प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर मला बोलायचे आहे. सर्वोच्च न्यायालयाने सर्वसमावेशक आदेश दिले आहेत. 2011 मध्ये यूपीएने हा करार रद्द केला होता. हा फसवणुकीचा सौदा होता, असं त्यांनी म्हटलंय. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी काँग्रेसच्या नेतृत्वाखालील यूपीए सरकारवर राष्ट्रीय सुरक्षेसाठी वापरल्या जाणाऱ्या एस-बँड स्पेक्ट्रमची विक्री करण्यासाठी सत्तेचा गैरवापर केल्याचा आरोप केला आहे.

तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशावरून यूपीए सरकार कसे चुकीचे काम करत होते हे दिसून येते, असंही त्या म्हणाल्या आहेत. अँट्रिक्स-देवस करार राष्ट्रीय सुरक्षेच्या विरोधात होता. भारतातील जनतेची अशी फसवणूक कशी झाली हे आता काँग्रेस पक्षाने सांगावे, असं आव्हानही त्यांनी दिलंय.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()