‘आझादी क्वेस्ट’द्वारे स्वातंत्र्ययोद्ध्यांचे स्मरण; अनुराग ठाकूर

केंद्रीयमंत्री अनुराग ठाकूर यांच्या हस्ते मोबाईल गेमचे उद्‌घाटन
Anurag Thakur Mobile game app Commemoration of freedom fighters through Azadi Quest
Anurag Thakur Mobile game app Commemoration of freedom fighters through Azadi Quest sakal
Updated on

नवी दिल्ली : स्वातंत्र्यलढ्यातील अप्रसिद्ध नायकांची ओळख जगासमोर आणण्यासाठी केंद्र सरकारने मोबाईल गेमचे माध्यम निवडले आहे. केंद्रीय माहिती व प्रसारणमंत्री अनुराग ठाकूर यांनी ‘आझादी क्वेस्ट : हिरोज्‌ आणि माईलस्टोन ऑफ इंडिया फ्रीडम’ ही मोबाईल गेमची मालिका असलेल्या अॅपचे आज उद्घाटन केले. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने भारतीय स्वातंत्र्यलढ्याची कहाणी लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी ही मोबाईल गेमची मालिका सुरू करण्यात आली आहे. स्वातंत्र्यलढ्यातील स्वातंत्र्यसैनिकांचे आणि विस्मृतीत गेलेल्या वीरांचे या निमित्तामे स्मरण करण्याचा हा प्रयत्न असल्याचे प्रतिपादन केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी केले.

ही ऑनलाइन लर्निंग मोबाईल गेम सीरिज ‘झिंगा इंडिया’च्या सहकार्याने विकसीत करण्यात आली आहे. यासाठी भारत सरकारच्या विविध शाखांनी देशाच्या कानाकोपऱ्यातून स्वातंत्र्यसैनिकांची माहिती गोळा केली आहे. ‘आझादी क्वेस्ट’ मालिकेतील पहिले दोन गेम भारताच्या स्वातंत्र्यलढ्याची कहाणी सांगणारे आहेत. हे खेळ केंद्र सरकारच्या प्रकाशन विभागाद्वारे तयार करण्यात आले असून भारतीय ऐतिहासिक संशोधन परिषदेच्या तज्ज्ञांनी त्याची छाननी केली आहे.

गेल्या काही वर्षांत भारत गेमिंगच्या क्षेत्रात जगात पहिल्या पाच क्रमांकावर आला आहे. लोकांमध्ये उत्साह, जागरुकता निर्माण करण्यासाठी हे अॅप आणले असून या निमित्ताने ऑनलाइन गेमच्या प्रचंड बाजारपेठेत प्रवेश करण्याचा प्रयत्न आहे. लवकरच हा खेळ घराघरांत पोहोचेल, असा विश्वास अनुराग ठाकूर यांनी यावेळी व्यक्त केला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.