Apple Alert: आयफोन हँकिंगच्या विरोधकांच्या आरोपांना भाजपचं प्रत्युत्तर; चुकीचं काही पाहता...

आयफोनच्या हॅकिंगद्वारे सरकार इंडिया आघाडीतील नेत्यांची हेरगिरी करत असल्याचा गंभीर आरोप विरोधकांनी केला आहे.
Rahul Gandhi
Rahul Gandhi
Updated on

नवी दिल्ली : आयफोनच्या हॅकिंगद्वारे सरकार इंडिया आघाडीतील नेत्यांची हेरगिरी करत असल्याचा गंभीर आरोप विरोधकांनी केला आहे. राहुल गांधी, महुआ मोईत्रा, प्रियंका चतुर्वेदी, शशी थरूर अशा मोठ्या नेत्यांनी याबाबत अ‍ॅपल कंपनीने आपल्याला इशारा दिल्याचं म्हटलं होतं.

पण आता या आरोपांना भाजपनं प्रत्युत्तर दिलं आहे. जर तुम्ही मोबाईलवर काही चुकीचं पाहात असाल तर असे अॅलर्ट येणारचं असं भाजपचे नेते गौरव भाटिया यांनी म्हटलं आहे. (Apple alert state sponsored attacks BJP leader Gaurav Bhatia gives answers to INDIA leaders)

Rahul Gandhi
Eknath Shinde: "मराठा आरक्षणाचे खरे मारेकरी उद्धव ठाकरे"; CM शिंदेंचा हल्लाबोल

वाईट राजकारण सुरु

विरोधकांचे आरोप कायम चुकीचे आणि निराधार असतात. अॅपल कंपनीकडून देखील हे स्पष्ट करण्यात आलं आहे की, हे जे अॅलर्ट येतात ते चुकीच्या गोष्टींचे आलार्म असतात. पण राहुल गांधी आणि इतर लोक जे कायदेशीर प्रक्रियेचं पालन करत नाहीत, त्याची कुठलीही तक्रार पोलिसांत देत नाहीत. अॅपल कंपनीला कुठलंही पत्र लिहित नाहीत. पण यावरुन वाईट राजकारण करत बसतात. (Latest Marathi News)

Rahul Gandhi
Maratha Reservation: नव्यानं गोळा करणार इम्पिरिकल डेटा; मराठा समाजाचं मागासलेपण तपासण्यासाठी मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय

मोबाईलवर चुकीचा कन्टेंट पाहतात

आम्ही देखील एकदा सायबर एक्सपर्टशी बोललो होते. त्यांनी आम्हाला जे काही सांगितलं त्यातील एक गोष्ट प्रामुख्यानं इथं सागेन की, "हे मालवेअर, फिशिंग किंवा स्पायवेअर तुमच्या फोनवर तेव्हाच येतात जेव्हा काही देश जे भारताशी शत्रुत्व राखतात तसेच ते लोक याप्रकारची हेरगिरी करण्यात निपुण आहेत. ते जर अशा वेबसाईट्सवर जात असतील आणि चुकीचा कन्टेंट पाहात असतील तर तुम्हाला मोबाईलवर अशा प्रकारचे मालवेअर पहायला मिळतील.

Rahul Gandhi
Marathi News Update: दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचा एका क्लिकवर

राहुल गांधींनी मोबाईलचा सदुपयोग करावा

त्यामुळं मी राहुल गांधींना इतकीच विनंती करेल की त्यांनी आपल्या मोबाईलचा सदुपयोग करावा. अशा कोणत्याही शक्तींसोबत कोणतीही युती करु नका, जी देशविरोधी आहे. तसेच अशा कोणत्याही वेबसाईटवर जाऊ नका जिथं कोणत्याही भारतीयांनं जाणं योग्य नाही, अशा शब्दांत गौरव भाटीया यांनी राहुल गांधींसह इंडिया आघाडीतील आरोप करणाऱ्या नेत्यांना सल्ला दिला आहे. (Marathi Tajya Batmya)

Rahul Gandhi
Rahul Gandhi: 'मोदींचा आत्मा अदानींच्या हातात' अ‍ॅपल अलर्टचे थेट कनेक्शन...; राहुल गांधींचा मोठा आरोप

इंडियातील नेत्यांचा आरोप काय?

इंडिया आघाडीतील नेते महुआ मोईत्रा, शशी थरुर, प्रियंका चतुर्वेदी तसेच राहुल गांधी यांनी गंभीर आरोप केले आहेत की, 'स्टेट स्पॉन्सर्ड अॅटॅकर्स' तुमच्या मोबाईलला टार्गेट करत आहेत, असा इशारा विरोधकांच्या अनेक नेत्यांना अॅपल कंपनीकडून आला आहे. यावरुन सरकार विरोधकांची हेरगिरी करत असल्याचा गंभीर आरोप राहुल गांधी यांनी केला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.