नवी दिल्ली- केंद्र सरकारने सक्तवसुली संचालनालयाच्या (ED) प्रमुखपदी राहुल नवीन यांची नियुक्ती केली आहे. त्यांच्याकडे दोन वर्षांपर्यंत हा कार्यभार असणार आहे. एएनआयने यासंदर्भातील माहिती दिली आहे. सक्तवसुली संचलनालयाचे (ईडी) संचालक म्हणून केंद्र सरकारने भारतीय महसूल सेवेचे अधिकारी राहुल नवीन यांची नियुक्ती केली.
नवीन हे 1993 च्या बॅचचे अधिकारी आहेत. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या नियुक्तीविषयक समितीच्या बुधवारी झालेल्या बैठकीत नवीन यांच्या नियुक्तीवर शिक्कामोर्तब करण्यात आले. ईडीच्या संचालकपदी नियुक्ती होण्यापूर्वी नवीन हे याच संस्थेत विशेष संचालक म्हणून कार्यरत होते. प्रभारी संचालक म्हणून मागील अकरा महिन्यांपासून ते कार्यरत होते. थोडक्यात 11 महिन्यानंतर ईडीला पूर्णवेळ संचालक मिळाला आहे. राहुल नवीन यांचा सेवाकाळ दोन वर्षांचा राहील, असे सरकारकडून सांगण्यात आले आहे.