कुतुब आणि वादांचा ‘मीनार' !

पूजाअर्चा करण्यास परवानगी नाही- एएसआय
Archaeological Survey of India banned Prayer at Qutub Minar premises
Archaeological Survey of India banned Prayer at Qutub Minar premisessakal
Updated on

नवी दिल्ली : युनेस्कोने एतिहासिक वारसास्थळ म्हणून घोषित केलेल्या राजधानी दिल्लीतील कुतुबमीनारच्या आवारात कोठेही पूजाअर्चा-प्रार्थना करण्यास भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाने (एएसआय) बंदी घातली आहे. दुसरीकडे न्यायालयात दाखल केलेल्या प्रतिजापत्रात ‘एएसआय' कडून असाही दावा करण्यात आलाय की या परिसरात आजही अनेक हिंदू देवदेवतांच्या मूर्ती व चिन्हे आहेत व हिंदू व जैन मंदिरे तोडून कुतुबमीनार परिसरात बांधकाम करण्यात आले आहे, अशी कबुली या प्रतिज्ञापत्रात देण्यात आली आहे.

कुव्वत-उल-इस्लाम परिसरतील मशीद ही अनेक मंदिरे पाडून बांधली गेली आहे त्यामुळे येथे पूजाअर्चेला, प्रार्थनेला परवानगी द्यावी अशी याचिका हिंदू पक्षाचे वकील हरीशंकर जैन व रंजना अग्निहोत्री यांनी दाखल केलेल्या याचिकेवर साकेत न्यायालयात आजपासून सुनावणी सुरू झाली.

एएसआयने न्यायालयात सादर केलेल्या ताज्या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे की कुतुबमीनार हे एक स्मारक आहे व अशा प्रकारच्या वास्तूरचनेत कोणीही (नमाज पठणाचा) मौलिक अधिकार असल्याचा दावा करू शकत नाही. या ठिकाणी पूजा किंवा उपासना करण्यात येऊ शकत नाही. एएसआय कायदा १९५८ मध्ये कोणत्याही स्मारकात कोणताही धार्मिक विधी- पूजापाठ करण्याचा हक्क देण्याची तरतूदच नाही त्यामुळे येथे पूजेला परवानगी दिली जाऊ शकत नाही. असेही त्यांनी म्हटले आहे.

दिल्ली उच्च न्यायालयाने १९९९ मध्ये दिलेल्या यासंदर्भातील एका आदेशाचाही उल्लेख या प्रतिज्ञापत्रात करण्यात आलेला आहे. महंमद घोरी या आक्रमण कर्त्याच्या कुतुबुद्दीन नावाच्या सेनापतीने कुतुबमीनार बांधताना कुव्वत-उल-इस्लाम मशीद परिसरातील किमान २७ मंदिरे उध्वस्त केली होती असे एएसआयच्याच एतिहासिक दस्तावेजात नमूद करण्यात आल्याचेही हिंदू पक्षाच्या याचिका कर्त्यांनी म्हटले आहे.

कुतुबमिनारच्या परिसरात खोदकाम करण्याचा केंद्र सरकारचा तूर्त कोणताही इरादा नाही असे केंद्रीय सांस्कृतिक मंत्री जी किशन रेड्डी यांनी नुकतेच स्पष्ट केले होते. कुतुबमिनार परिसरात यापूर्वी १९९१ मध्ये खोदकाम करण्यात आले होते. मात्र त्याची कारणे वेगळी होती असे पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.काही हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी येथे पूर्वी मंदिर असल्याचा दावा करीत कुतुबमिनार च्या आवारात हनुमान चालीसा पठण केल्यावर याबाबतचा वाद उफाळला होता. दिल्लीतील शेकडो मंदिरे पाडून मशिदी व दर्गे उभारल्याचा आरोप भाजप नेत्यांनी केला आहे.

कुतुब मिनार परिसरात खोदकाम करण्यात येणार आहे, अशा सोशल मिडीयावरील अफवांमध्ये तथ्य नसल्याचे रेड्डी यांनी म्हटले होते. मात्र पुरातत्व विभागाची ताजी भूमिका लक्षात घेता केंद्राचा हेतू दिसतो तेवढा साफ नसल्याचा संशय मुस्लिम समाजातील धुरीणांनी व्यक्त केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.