Indian Army : भारतीय जवानाला लाठ्या-काठ्यांनी बेदम मारहाण; नगरसेवकासह 9 जण अटकेत

सीमेवर रात्रंदिवस उभं राहून आपल्या देशातील नागरिकांचं रक्षण करणाऱ्या जवानाबाबत एक दुर्दैवी घटना समोर आलीये.
Indian Soldier
Indian Soldieresakal
Updated on
Summary

हल्ल्यात प्रभू यांना वाचवण्यासाठी धावलेला त्यांचा भाऊ प्रभाकरन देखील जखमी झाला.

सीमेवर रात्रंदिवस उभं राहून आपल्या देशातील नागरिकांचं रक्षण करणाऱ्या जवानाबाबत एक दुर्दैवी घटना समोर आलीये. लष्करातील (Indian Army) जवानाला (Indian Soldier) बेदम मारहाण करून त्याची हत्या करण्यात आली आहे.

या प्रकरणी एका नगरसेवकासह 9 जणांना अटक झाली आहे. या हल्ल्यात सैनिकाचा भाऊही जखमी झाला आहे. ही घटना तमिळनाडूच्या कृष्णागिरी (Tamil Nadu Krishnagiri) जिल्ह्यात घडली आहे.

इथं काही दिवसांपूर्वी प्रभू (29) नावाच्या सैनिकाचा येथील द्रविड मुन्नेत्र कळघम पक्षाचा (Dravida Munnetra Kazhagam Party) नगरसेवक चिन्नास्वामी याच्याशी वाद झाला होता. सार्वजनिक टँकवर कपडे धुण्यावरून हा वाद झाला होता, अशी माहिती पोलिसांनी दिलीये. 8 फेब्रुवारीला याच कारणावरून या दोघांमध्ये कडाक्याचं भांडण झालं होतं.

Indian Soldier
Asaduddin Owaisi : हिंदू राष्ट्राचा उल्लेख करताच ओवैसी धीरेंद्र शास्त्रींवर भडकले; म्हणाले, हा सगळा बकवास..

त्यावेळी तिथं उपस्थित जमावानं नगरसेवकाची साथ देत प्रभूवर हल्ला केला. त्यांनी लाठ्या-काठ्यांनी प्रभू यांना बेदम मारहाण केली. या हल्ल्यात प्रभू यांना वाचवण्यासाठी धावलेला त्यांचा भाऊ प्रभाकरन देखील जखमी झाला. या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या प्रभू यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तिथं उपचारांदरम्यान बुधवारी रात्री त्यांचं निधन झालं. याबाबतचा अधिक तपास पोलिस करत आहे.

Indian Soldier
Al Qaeda : लादेन, जवाहिरीनंतर अल-कायदाला मिळाला नवा प्रमुख; जाणून घ्या खतरनाक दहशतवादी कोण आहे?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()