देशातील तब्बल सात टक्के बालके कुपोषित; स्मृती इराणींची माहिती

malnourished
malnourished sakal
Updated on

नवी दिल्ली: भारतात अद्यापही लहान मुलांच्या कुपोषणाची समस्या ज्वलंत आहे. या समस्येशी दोन हात करण्याचे प्रयत्न सातत्याने सुरु आहेत. यासंदर्भातीलच एक महत्त्वाची माहिती महिला आणि बाल विकास कल्याण मंत्री स्मृती इराणी (Smriti Irani) यांनी काल बुधवारी राज्यसभेत दिली आहे. त्यांनी म्हटलंय की, भारतातील सुमारे 7 टक्के मुले ही कुपोषित असल्याचा अंदाज आहे. जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) जाहीर केलेल्या मानकांनुसार वजन केलेल्या अंगणवाड्यांमधील एक कोटी बालकांच्या डेटाचे मूल्यमापन करून त्यांनी ही माहिती दिली आहे.

malnourished
Sri Lanka Crisis: सनथ जयसूर्या म्हणतो, भारताने मोठ्या भावाप्रमाणे आम्हाला...

यामध्ये गंभीरपणे आणि अधिक तीव्र कुपोषित श्रेणीतील २% बालकांचा समावेश आहे. पुढे त्यांनी अधोरेखित केलं की, राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण (NFHS) डेटामध्ये उद्धृत केलेल्या आकडेवारीच्या तुलनेत ही आकडेवारी कमी आहे, म्हणजेच कुपोषित बालकांच्या संख्येत घट झाली आहे. कारण NFHS डेटानुसार देशातील सुमारे 19% मुले कुपोषित आहेत. इराणी पुढे म्हणाल्या की, “आम्ही थर्ड पार्टीकडून डेटा गोळा केला असल्याने हे आकडे प्रमाणित आहेत. इंडियन अकादमी ऑफ पेडियाट्रिक्सने हा डेटा गोळा केला असून हे आकडे प्रमाणित आहेत.

malnourished
Petrol Diesel Rate: पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर; जाणून घ्या आजची किंमत

प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान, आरएस सदस्य जीसी चंद्रशेखर यांच्या पुरवणी प्रश्नाला उत्तर देताना इराणी म्हणाल्या की, फेब्रुवारी महिन्यामध्ये अंगणवाड्यांमधील एक कोटीपेक्षा जास्त मुलांचे वजन WHO च्या मानकांनुसार केले गेलं तेव्हा गंभीरपणे कुपोषित असलेल्या मुलांची संख्या ही 2% च्या आसपास आढळून आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.