Brij Bhushan Singh : ब्रिजभूषण सिंह यांना पंधरा दिवसांत अटक करा; पैलवानांसह शेतकऱ्यांचा सरकारला इशारा

BJP MP Brij Bhushan Singh
BJP MP Brij Bhushan SinghSakal
Updated on

Wrestlers Protest: रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडिया (WFI) चे अध्यक्ष आणि भाजप खासदार ब्रिजभूषण सिंग यांच्यावर कारवाई व्हावी, या मागणीसाठी आंदोलक आक्रमक झाले आहेत. आंदोलकांनी सरकारला २१ तारखेपर्यंतचा वेळ दिलाय.

लैंगिक छळाच्या आरोपांमुळे त्यांची पदावरून हकालपट्टी करावी या मागणीसाठी कुस्तीपटू गेल्या दोन आठवड्यांपासून जंतरमंतरवर निदर्शने करत आहेत. आंदोलकांनी केंद्र सरकारला १५ दिवसांचा अल्टिमेटम दिला आहे.

BJP MP Brij Bhushan Singh
Republic Day 2024 : प्रजासत्ताकदिनी स्त्री शक्तीचा जागर; 'परेड-परफॉर्मन्स'सह सर्व उपक्रमांमध्ये महिलांचाच सहभाग

डब्ल्यूएफआयचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंग यांनी रविवारी कुस्तीपटूंच्या निषेधावर प्रतिक्रिया व्यक्त केली. ते म्हणाले, माझ्यावरील एकही आरोप सिद्ध झाला तर मी स्वतः फाशी घेईन. त्यांचाही मुद्दा लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे. म्हणूनच हा व्हिडिओ बनवत आहे. माझ्यावर आरोप करणारे हे खेळाडू कोणता दिवस होता आणि कोणती तारीख होती हे देखील सांगू शकत नाहीत, असं ते म्हणाले.

पैलवानांच्या आंदोलनाला शेतकरी संघटना आणि खाप पंचायतींनी समर्थ दिलेलं आहे. जंतर मंतरवर मोठ्या संख्येने शेतकरी आणि आंदोलक पोहोचले आहेत. आंदोलनस्थळी मोठी गर्दी होत झाल्याने दिल्ली पोलिस अलर्ट मोडवर आलेले आहेत.

BJP MP Brij Bhushan Singh
Virat Kohli : अँकर इनिंग खेळणाऱ्या बॅट्समनची अखेरची घरघर .... विराटने 46 चेंडूत 55 धावा केल्यानंतर पॉटिंग काय म्हणाला?

शेतकरी संघटनांनी पैलवानांसोबत आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी राकेश टिकैत, २४ संघटनांचे प्रतिनिधी, विनेश फोगाट, साक्षी मलिक यांची उपस्थिती होती. आंदोलकांनी सरकारला पंधरा दिवसांचा अल्टिमेटम दिला. २१ मे पर्यंत ब्रिजभूषण यांच्यावर अटकेची कारवाई झाली नाही आम्ही मोठा निर्णय घेणार आहोत, असा इशारा आंदोलकांनी दिला आहे.

१२ वर्षांत मी एकाही मुलीला चुकीच्या नजरेने पाहिलं नाही- ब्रिजभूषण

पैलवान असलेल्या कोणत्याही मुलीला हे आरोप खरे आहेत का, असे विचारले पाहिजे. १२ वर्षांत मी एकाही मुलीला चुकीच्या पद्धतीने पाहिलेलं नाही. मी चार महिन्यांपासून लोकांच्या शिव्या ऐकत आहे. पहिल्या दिवशीही मी म्हटलं होतं की, एकही आरोप सिद्ध झाला तर मला फासावर जाईल, आजही मी तेच सांगत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.