Article 370 Movie Review : आर्टिकल 370 पाहिल्यावर मुख्यमंत्र्यांनी सांगितला review, यामी गौतमच्या अभिनयाबद्दल सांगितलं असं काही..

आर्टिकल 370 रद्द केल्यानंतर जम्मू-काश्मीर देशाच्या मुख्य प्रवाहाशी जोडले गेले
Article 370 Movie Review
Article 370 Movie Review esakal
Updated on

Article 370 Movie Review :  जम्मू-काश्मीरमधील दहशतवाद संपवणे आणि भ्रष्टाचाराचा नायनाट करणे या विषयावर आधारित आर्टिकल 370 हा चित्रपट तेथील तत्कालीन परिस्थिती समाजासमोर आणण्याचा अर्थपूर्ण प्रयत्न असल्याचे उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी म्हणाले. तसेच, या चित्रपटातील अभिनेत्री यामी गौतम हीच्या अभिनय कौशल्याचे कौतुकही यावेळी त्यांनी केले.

5 ऑगस्ट 2019 रोजी भारत सरकारने काश्मीरमधून आर्टिकल 370 हटवून एक अभूतपूर्व निर्णय घेतला होता. जिथे या ऐतिहासिक निर्णयावर बनवलेला आर्टिकल 370 हा चित्रपट देशभरात प्रदर्शित झाला आहे. यानिमित्ताने उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी आपल्या कॅबिनेट सदस्यांसह हा चित्रपट पाहण्यासाठी आले होते.

Article 370 Movie Review
Article 370 Trailer: 'द कश्मीर फाईल्स'नंतर आता 'आर्टिकल 370' मांडणार काश्मिरची कहाणी! अंगावर शहारे आणणारा ट्रेलर रिलीज

मुख्यमंत्री श्री पुष्कर सिंग धामी यांनी रविवारी संध्याकाळी राजपूर रोडवरील मॉलमध्ये जम्मू-काश्मीरमधील दहशतवाद आणि भ्रष्टाचारावर आधारित आर्टिकल 370 हा चित्रपट पाहिला. यानंतर ते माध्यमांशी बोलत होते. मुख्यमंत्र्यांनीही चित्रपटाचे दिग्दर्शक आणि इतर कलाकारांच्या अभिनयाचे कौतुक केले आहे.

आर्टिकल 370 चित्रपटातील यामी गौतमची भूमिका म्हणजे महिला सक्षमीकरणाचे उत्तम उदाहरण असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. तसेच, चित्रपटातील यामुळे लोकांना योग्य माहिती मिळण्यास नक्कीच मदत होईल. ते म्हणाले की, केंद्र सरकारने आर्टिकल 370 रद्द केल्यानंतर जम्मू-काश्मीर देशाच्या मुख्य प्रवाहाशी जोडले गेले असून राज्यात विकासाचे नवे आयाम प्रस्थापित होत आहेत.

Article 370 Movie Review
Article 370 Box Office Collection: बॉक्स ऑफिसवर ‘आर्टिकल 370’ ची बंपर ओपनिंग! रिलीजच्या पहिल्या दिवशी केली एवढी कमाई

अशा परिस्थितीत अभिनेत्री यामी गौतमचा हा 'आर्टिकल 370' चित्रपट नुकताच चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, आर्टिकल 370 चा ट्रेलर खूपच प्रभावी होता. हे पाहून प्रेक्षक या चित्रपटाच्या प्रदर्शनाची आतुरतेने वाट पाहत होते.

या आर्टिकल 370 चित्रपटाची देशभरात आधीच चर्चा झाली होती. चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी पीएम मोदींनीही यावर चर्चा केली होती. त्यानंतर हा चित्रपट अधिकच चर्चेत आहे. हा चित्रपट पाहण्यासाठी उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी काल (रविवारी) त्यांच्या कॅबिनेट मंत्र्यांसह आर्टिकल 370 पाहण्यासाठी हजेरी लावली.

Article 370 Movie Review
Uttrakhand Election: सहा महिन्यांत ५५० पेक्षा जास्त निर्णय घेऊन कार्यवाही केली-धामी

मुख्यमंत्र्यांसोबत कॅबिनेट मंत्री प्रेमचंद अग्रवाल, गणेश जोशी, आमदार मुन्ना सिंह चौहान, अनिल नौटियाल, सुरेश गदिया, सविता कपूर आदी उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()