Arun Kumar Sinha Death : पंतप्रधानांना सुरक्षा पुरवणाऱ्या एसपीजीचे प्रमुख अरूण कुमार सिन्हा यांचं निधन

Arun Kumar Sinha Death Director of the Special Protection Group passed away at a hospital in Gurugram
Arun Kumar Sinha Death Director of the Special Protection Group passed away at a hospital in Gurugram
Updated on

स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप (SPG) चे संचालक अरुण कुमार सिन्हा यांचे गुरुग्राम येथील रुग्णालयात निधन झाले. ते ६१ वर्षांचे होते आणि आजारी होते. सिन्हा हे १९८७ च्या बॅचचे केरळ केडरचे आयपीएस अधिकारी होते. त्यांना नुकतीच सेवेत मुदतवाढ देण्यात आली आहे. २०१६ पासून SPG चे प्रमुख म्हूणून त्यांनी काम केलं होतं.

सिन्हा यांनी आपल्या करियरमध्ये अनेक महत्वाच्या पदांवर काम केलं आहे. ते केरळचे डीसीपी कमिश्नर, इंटेलिजन्स आयजी आणि तिरुवनंतपुरम मध्ये प्रशासन आयजी देखील होते. मालदीव येथे राष्ट्रपती अब्दुल गयूम यांच्या हत्या प्रकरणाची उकल केल्यामुळे त्यांना ओळख मिळाली. त्यांनी हत्येच्या आरोपींना दिल्लीतून पकडले होते. तेव्हा सिन्हा केरळमध्ये तैनात होते. त्यांचे काम पाहून सर्व्हिसदरम्यान त्यांना अनेक पुरस्कार आणि पदके देऊन सन्मानित करण्यात आले होते.

Arun Kumar Sinha Death Director of the Special Protection Group passed away at a hospital in Gurugram
Kirit Somaiya News : भाजप नेते किरीट सोमय्या आक्षेपार्ह व्हिडिओ प्रकरणात मोठी अपडेट; मुंबई पोलिसांनी...

SPG काय काम करते?

पंतप्रधान आणि त्यांच्या कुटुंबाच्या सुरक्षेची जबाबदारी स्पेशल प्रोटेक्शन ग्रुपवर असते. या गटाची स्थापना १९८५ मध्ये झाली होती, माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर एसपीजीची स्थापना करण्यात आली होती. एसपीजी पंतप्रधानांचे घर, कार्यालय, कार्यक्रम, देशात किंवा परदेशात कुठेही भेटी दरम्यान पंतप्रधानांची सुरक्षा पाहते.

यापूर्वी माजी पंतप्रधान आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या सुरक्षेची जबाबदारीही एसपीजीकडे होती, मात्र २०१९ मध्ये नवीन कायदा आणून हा नियम बदलण्यात आला. नवीन नियमानुसार, कोणताही पंतप्रधान पद सोडल्यानंतर पाच वर्षांसाठी एसपीजी संरक्षण घेऊ शकतो, तेही इंटेलिजन्स अहवालाच्या आधारे ठरवले जाते.

Arun Kumar Sinha Death Director of the Special Protection Group passed away at a hospital in Gurugram
Consumer Court News : एक बिस्किट की कीमत तुम क्या जानो! आयटीसीला मापात पाप भोवलं; भरवा लागला मोठा भुर्दंड

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.