मोतीलाल व्होरांच्या मुलाचे राहुल गांधींबाबत मोठे वक्तव्य; म्हणाले...

Arun Vora said Rahul Gandhi cannot make such allegations against my father
Arun Vora said Rahul Gandhi cannot make such allegations against my fatherArun Vora said Rahul Gandhi cannot make such allegations against my father
Updated on

नवी दिल्ली : राहुल गांधी माझ्या वडिलांवर असे आरोप करू शकत नाही. काँग्रेस नेतृत्व कधीही चुकीचे असू शकत नाही, असे दिवंगत काँग्रेस नेते मोतीलाल व्होरा यांचा मुलगा आणि काँग्रेस आमदार अरुण व्होरा म्हणाले. राहुल गांधींनी (Rahul Gandhi) यंग इंडिया-एजेएल डीलची जबाबदारी मोतीलाल व्होरा यांच्यावर टाकल्याच्या वृत्तावर प्रतिक्रिया देताना ते बोलत होते. तसेच प्रसारमाध्यमांमध्ये येणाऱ्या बातम्या निराधार असल्याचे म्हटले. (Arun Vora said Rahul Gandhi cannot make such allegations against my father)

नॅशनल हेराल्ड मनी लाँड्रिंग प्रकरणी राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची ईडीच्या (ED) अधिकाऱ्यांनी तीन दिवस चौकशी केली. काँग्रेसचे दिवंगत नेते मोतीलाल व्होरा हे एजेएल आणि काँग्रेस-प्रवर्तित यंग इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यांच्यातील सर्व आर्थिक व्यवहारांसाठी अधिकृत स्वाक्षरी करणारे होते, असे राहुल गांधी यांनी ईडीला सांगितल्याचे सूत्रांकडून कळते.

Arun Vora said Rahul Gandhi cannot make such allegations against my father
पोलिसाची कॉलर पकडणे भोवले; रेणुका चौधरीविरुद्ध गुन्हा, म्हणाल्या...

सूत्रांनी सांगितले की, काँग्रेसचे (Congress) पवन बन्सल आणि मल्लिकार्जुन खर्गे यांनी त्यांच्या निवेदनात ईडीला सांगितले की, हा करार एका व्यक्तीने ठरवला नव्हता आणि व्होरा हे सर्व आर्थिक व्यवहारांसाठी मूलतः: जबाबदार होते. बन्सल आणि खर्गे यांच्याबद्दल माहिती नाही. सत्याचाच विजय होईल. सोनिया जी, राहुल जी आणि व्होरा जी जिंकतील, असेही अरुण व्होरा म्हणाले.

काय आहे यंग इंडिया-एजेएल करार?

भाजप (BJP) नेते आणि अधिवक्ता सुब्रमण्यम स्वामी यांनी २०१२ मध्ये ट्रायल कोर्टासमोर तक्रार दाखल केली की यंग इंडिया लिमिटेडद्वारे असोसिएटेड जर्नल्स लिमिटेडच्या अधिग्रहणात काही कॉंग्रेस नेते फसवणूक आणि विश्वासभंगात गुंतले होते. यंग इंडिया लिमिटेडने नॅशनल हेराल्डच्या मालमत्तेवर दुर्भावनापूर्वक कब्जा केल्याचा आरोप त्यांनी केला.

Arun Vora said Rahul Gandhi cannot make such allegations against my father
लष्कराकडून हिंदू शिक्षिका बाला यांच्या हत्येचा बदला; दोन दहशतवादी ठार

एजेएल ९० कोटींपेक्षा जास्त कर्जासह बंद झाले

नॅशनल हेराल्ड हे वृत्तपत्र जवाहरलाल नेहरूंनी १९३८ मध्ये इतर स्वातंत्र्यसैनिकांसह स्थापन केले होते. हे वृत्तपत्र असोसिएटेड जर्नल्स लिमिटेडने (एजेएल) प्रकाशित केले होते. २००८ मध्ये एजेएल ९० कोटींपेक्षा जास्त कर्जासह बंद झाले. मोतीलाल व्होरा हे त्यावेळी AICC चे खजिनदार होते आणि एजेएल प्रकरणांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग होता. जानेवारी २००८ मध्ये एजेएल समूहाचे नॅशनल हेराल्ड वृत्तपत्र बंद करण्याची घोषणा करणाऱ्या करारावर त्यांनी सह-स्वाक्षरीही केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.