Arvind Kejriwa : केजरीवालांनी मोहन भागवातांना विचारले 'हे' पाच अवघड प्रश्न; मोदींच्या निवृत्तीबद्दलही मागितला खुलासा

Arvind Kejriwal's questions to Mohan Bhagwat : मी निगरगट्ट नाही, त्यामुळे भाजपचे लोक जेव्हा मला चोर आणि भ्रष्टाचारी म्हणून संबोधतात, तेव्हा मला दु:ख होते, असे केजरीवाल म्हणाले.
Arvind Kejriwal 5 Questions to RSS Chief Mohan Bhagwat
Arvind Kejriwal 5 Questions to RSS Chief Mohan Bhagwat
Updated on

नवी दिल्ली : ‘‘मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीची मला आस नाही आणि पैसेही मिळवायचे नाहीत, त्यामुळे भाजपचे लोक जेव्हा मला चोर आणि भ्रष्टाचारी म्हणून संबोधतात तेव्हा मला दु:ख होते,’’ अशी खंत दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे (आप) नेते अरविंद केजरीवाल यांनी रविवारी ‘जनता की अदालत’ या कार्यक्रमात बोलताना सांगितले. जंतर-मंतरवर आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमास पक्षाचे वरिष्ठ नेते, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी बोलताना केजरीवाल म्हणाले, ‘‘भ्रष्टचाराविरोधात जंतर-मंतरवर २०११ मध्ये आंदोलन केले. त्यानंतर आम्ही पक्षाची स्थापना करत दिल्लीमध्ये सत्तेत आलो. लोकांना विविध प्रकारच्या सुविधा दिल्या. वीज आणि पाणी मोफत दिले, महिलांना बस प्रवास मोफत केला. ज्येष्ठ नागरिकांसाठी तीर्थयात्रा दर्शन योजना सुरू केली. मोहल्ला क्लिनिक सुरू केली; त्याचप्रमाणे येथील सरकारी शाळांचा दर्जा सुधारला. दहा वर्षे प्रामाणिकपणे काम करणाऱ्या अरविंद केजरीवालांना हरवू शकत नाही, याची जाणीव झाल्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आमच्याविरोधात खोटे आरोप केले. आमच्या सरकारमधील मंत्री आणि नेत्यांना तुरुंगात टाकण्यात आले.’’

Arvind Kejriwal 5 Questions to RSS Chief Mohan Bhagwat
Maratha Reservation : मराठा आंदोलकांच्या शिष्टमंडळाला मुख्यमंत्री शिंदेंचे मोठे आश्वासन… बैठकीत नेमकी काय झाली चर्चा?

मी निगरगट्ट नाही

देशाचे राजकारण बदलण्यासाठी मी या क्षेत्रात आलो. मी निगरगट्ट नाही, त्यामुळे भाजपचे लोक जेव्हा मला चोर आणि भ्रष्टाचारी म्हणून संबोधतात, तेव्हा मला दु:ख होते, असे केजरीवाल म्हणाले.

थोड्या दिवसांत सरकारी निवासस्थान सोडणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले. ‘‘आज माझ्याकडे राहण्यासाठी घर नाही. पण लोकांचे अपार प्रेम सोबत आहे. दिल्लीतील अनेक लोकांनी आमच्या घरी येऊन राहा, असा संदेश पाठवला आहे. मी जर भ्रष्टाचार केला असता तर १० वर्षांत १० बंगले आणि घरे बनवली असती. मात्र मी पैसा नाही तर जनतेचे प्रेम कमावले आहे,’’ असे प्रतिपादन केजरीवाल यांनी यावेळी बोलताना केले. ‘‘माझ्याविरोधातला खटला कधी संपेल याची कल्पना नाही. मात्र जोपर्यंत माझ्यावर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत, तोवर मी मुख्यमंत्रिपदावर बसणार नाही. हा डाग घेऊन मी जिवंत राहू शकत नाही. त्यामुळेच मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिलेला आहे,’’ असे केजरीवाल म्हणाले. यावेळी बोलताना केजरीवाल यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांना प्रश्‍न विचारत भाजपवर टीकास्त्र सोडले.

Arvind Kejriwal 5 Questions to RSS Chief Mohan Bhagwat
Golden Temple : गोल्डन टेम्पलबाहेर तरुणाने गनमॅनकडून बंदुक हिसकावली अन्... घडलेल्या प्रकार पाहूण तुम्हीही हादराल

केजरीवालांचे भागवतांना प्रश्‍न

ज्यापद्धतीने तपास संस्थांची भीती दाखवून विरोधी पक्ष फोडले जात आहेत, ते लोकशाहीसाठी योग्य आहे का?

सर्वात भ्रष्ट नेत्यांना मोदी यांनी भाजपमध्ये घेतले. अशा स्वरूपाच्या भाजपची तुम्ही कल्पना केली होती का?

भाजप पदभ्रष्ट झाला आहे, या पक्षाची सध्याची धोरणे आणि कृती तुम्हाला मान्य आहेत का?

लोकसभा निवडणुकीदरम्यान भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी भाजपला रा. स्व. संघाची गरज नसल्याचे म्हटले होते त्याचे तुम्हाला आणि संघ कार्यकर्त्यांना वाईट वाटले नाही का?

वयाची ७५ वर्षे झाल्यानंतर कोणत्याही व्यक्तीला निवृत्त व्हावे लागेल, असा कायदा भाजपने बनवला होता. हा कायदा मोदी यांना लागू होत नसल्याचे गृहमंत्री अमित शहा सांगत आहेत. याच्याशी संघ सहमत आहे का?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.