नवी दिल्ली : दिल्ली सरकारला दिलासा देणारा सुप्रीम कोर्टाचा निर्णय पलटवण्यासाठी केंद्र सरकारनं नवा अध्यादेश आणला आहे. यामुळं आता दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आक्रमक झाले असून त्यांनी थेट विरोधकांना महत्वाचं आवाहन केलं आहे. (Arvind Kejriwal aggressive against center ordinance He appealed to opposition)
केजरीवाल म्हणाले, सुप्रीम कोर्टाचा निर्णय पलटवण्यासाठी केंद्र सरकारनं कट रचला आहे. यासाठी राष्ट्रीय राजधानी सिव्हिल सेवा प्राधिकर तयार करण्यासाठी केंद्र सरकारनं अध्यादेश आणला आहे. पण याविरोधात मी दिल्लीच्या जनतेमध्ये जाणार आणि दिल्लीत महारॅलीचं आयोजन करणार आहे. ज्याप्रकारे यावर जनतेची प्रतिक्रिया येत आहे, त्यावरुन हे वाटतं की भाजपला लोकसभा निवडणुकीत दिल्लीतून एकही जागा मिळणार नाही.
मी विरोधीपक्षांना आवाहन करतो की, राज्यसभेत जेव्हा हे विधेयक येईल तेव्हा ते मंजूर होऊ देऊ नका. यासाठी मी प्रत्येक पक्षाच्या नेत्यांची भेट घेऊन त्यांचा पाठिंबा मागणार आहे, असंही केजरीवाल यांनी म्हटलं आहे.
केंद्रानं आणला अध्यादेश
दिल्लीमध्ये गट अ अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई तसेच त्यांच्या बदल्यांसाठी केंद्र सरकारनं १९ मे २०२३ रोजी राष्ट्रीय राजधानी नागरी सेवा प्राधिकरण निर्माण करण्यासाठी अध्यादेश आणला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.