Arvind Kejriwal : जामीन मिळावा म्हणून अरविंद केजरीवालांच्या आहारात 'हे' पदार्थ; EDचा कोर्टात दावा

कोर्टाने केजरीवाल यांच्या वकिलांना सांगितलं की, तुम्ही मुख्यमंत्र्यांचा डाएट प्लान आम्हाला द्यावा. आम्हीही जेलमधून त्यासंदर्भातला रिपोर्ट मागवून घेऊ. या प्रकरणावर आता शुक्रवार, दि. १९ रोजी सुनावणी होणार आहे.
Arvind Kejriwal
Arvind Kejriwal esakal
Updated on

Arvind Kejriwal Arrest Updates : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे मद्य धोरण घोटाळ्याच्या आरोपांमुळे तिहार जेलमध्ये आहेत. यातच दिल्लीच्या राऊज अवेन्यू कोर्टात केजरीवाल यांच्या याचिकेवर सुनावणी पार पडली. सुनावणीच्या वेळी ईडीने दावा केला की ते प्रकृतीच्या कारणावरुन जामीन मिळवण्यासाठी जाणीवपूर्वक गोड खात आहेत.

कोर्टासमोर ईडीने म्हटलं की, केजरीवाल यांना टाईप २ चा मधुमेहाचा आजार आहे. ते जेलमध्ये बटाटा-पुरी, आंबे आणि गोड खात आहेत. असं ते जाणीवपूर्वक करत आहेत. हा एक प्रकारे मेडिकलच्या आधारावर जामीन घेण्याचा प्रकार आहे.

अरविंद केजरीवाल यांच्या प्रकृतीवरुन ईडीने म्हटलं की, कोर्टाने केजरीवाल यांना घरचं जेवण खाण्याची मुभा दिली आहे. जेल डीजींनी आम्हाला केजरीवाल यांच्या आहाराविषयी माहिती दिली आहे. त्यांना बीपीचा आजार आहे. तरीही ते बटाटा-पुरी, केळी, आंबे आणि गरजेपेक्षा गोड पदार्थ खात आहेत.

ईडीने म्हटलं की, टाईप-२ प्रकारची शुगर असणारा व्यक्ती असे पदार्थ खात असल्याचं आम्ही कधीच ऐकलं नाही. परंतु हे पदार्थ ते रोज खात आहेत. हा सगळा उपद्व्याप जामिनासाठी सुरु असल्याचं ईडीने म्हटलंय.

Arvind Kejriwal
Kl Rahul Birthday: जावयाच्या वाढदिवसानिमित्त सुनील शेट्टीची खास पोस्ट; हटके फोटो शेअर करत म्हणाला, "हे एक कनेक्शन आहे ..."

यावर कोर्टाने केजरीवाल यांच्या वकिलांना सांगितलं की, तुम्ही मुख्यमंत्र्यांचा डाएट प्लान आम्हाला द्यावा. आम्हीही जेलमधून त्यासंदर्भातला रिपोर्ट मागवून घेऊ. या प्रकरणावर आता शुक्रवार, दि. १९ रोजी सुनावणी होणार आहे.

Arvind Kejriwal
Share Market Closing: शेअर बाजारात विक्री सुरुच; सेन्सेक्स 454 अंकांनी घसरला, कोणते शेअर्स वधारले?

नेमकं प्रकरण काय?

अरविंद केजरीवाल हे शुगरचे पेशंट आहेत. त्यामुळे त्यांच्या वकिलांनी सुरुवातीलाच राऊज अवेन्यू कोर्टात व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या मदतीने नियमित डॉक्टरांकडून कन्सल्टिंग घेण्याची मागणी केली होती. परंतु आता त्यांच्या वकिलांनी हा अर्ज मागे घेतला आहे. याच अर्जाच्या विरोधात ईडीने कोर्टात त्यांच्या आहाराबद्दल माहिती दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.