नवी दिल्ली- अरविंद केजरीवाल यांनी आपण मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देत असल्याचं जाहीर केलं आहे. केजरीवाल म्हणाले की, 'मी दोन दिवसात राजीनामा देणार आहे. विधिमंडळ दोन दिवसात दिल्लीचा नवा मुख्यमंत्री निवडेल. जोपर्यंत जनता निर्णय देत नाही, तोपर्यंत मी खुर्चीवर बसणार नाही.' केजरीवाल जाहीर सभेमध्ये बोलत होते.
मी प्रत्येक घरात जाणार आहे, लोकांशी बोलणार आहे. पुढच्या वर्षी फेब्रुवारीमध्ये दिल्लीमध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. पण, माझी निवडणूक आयोगाला विनंती आहे की, त्यांनी नोव्हेंबरमध्येच निवडणूक घ्यावी. जोपर्यंत दिल्लीची जनता आपला निर्णय देत नाही, तोपर्यंत मी मुख्यमंत्री पदावर बसणार नाही. आता सर्वकाही लोकांच्या हाती आहे, असं केजरीवाल म्हणाले आहेत.