Arvind Kejriwal: केजरीवालांच्या अटकेमागं आहे 'या' व्यक्तीचं कनेक्शन! नेमकं काय घडलं? जाणून घ्या

दिल्लीतील कथित अबकारी घोटाळ्याप्रकरणी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ईडीनं नुकतीच अटक केली, कोर्टानं त्यांना २८ मार्चपर्यंत कोठडी सुनावली आहे.
Arvind kejriwal
Arvind kejriwalesakal
Updated on

नवी दिल्ली : दिल्लीतील कथित अबकारी घोटाळ्याप्रकरणी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीनं नुकतीच अटक केली. कोर्टानं त्यांना २८ मार्चपर्यंत कोठडी सुनावली आहे. पण केजरीवालांवर ही वेळ आणणारा एक व्यक्ती आहे. त्या व्यक्तीच्या एका स्टेटमेंटमुळं केजरीवाल यांच्यावर ईडीनं कारवाई केल्याचा आरोप आम आदमी पार्टीनं केला आहे. (arvind kejriwal arrest because of statement of sharadchandra reddy who is he)

Arvind kejriwal
Sanjay Raut: भारतात सध्या रशिया, चिनी राजकीय पॅटर्न सुरु; राऊतांचा हल्लाबोल

आम आदमी पार्टीच्या प्रवक्त्या आतिषी यांनी नुकतीच पत्रकार परिषद घेतली. यामध्ये त्यांनी ज्या प्रकरणात केजरीवाल यांना अटक झाली त्यामागची कहाणी सांगितली. तसेच या कथित घोटाळ्यात जर आर्थिक गैरव्यवहार झाला असेल किंवा पैशांची देवाण-घेवाण झाली असेल तर हा पैसा कुठे आहे? असा सवाल केला आहे. (Latest Marathi News)

Arvind kejriwal
PM Modi on Moscow Attack: रशियातील दहशतवादी हल्ल्याचा PM मोदींकडून तीव्र शब्दांत निषेध; म्हणाले, रशियन सरकार...

घोटाळा झाला आहे तर पैसा कुठे?

दिल्लीच्या तथाकथित मद्य घोटाळ्यात दोन वर्षापासून सीबीआय आणि ईडीकडून चौकशी सुरु आहे. या काळात वारंवार कनिष्ठ न्यायालय, हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टात हा प्रश्न उपस्थित झाला आहे की पैसा नेमका गेला कुठे? असंही म्हटलं गेलं की दारुच्या व्यापाऱ्यांना मोठा फायदा झाला पण जर हा फायदा झाला असेल तर त्यांनी कोणाला लाच दिली.

शेकडो छाप्यांनंतर, हजारो लोकांच्या चौकशीनंतर तसेच आम आदमी पार्टीचा कोणताही नेता, मंत्री, कार्यकर्त्याकडून या गुन्ह्यातील एक रुपयाही मिळालेला नाही. सुप्रीम कोर्टानंही वारंवार हा प्रश्न उपस्थित केला आहे, असं आतिषी यांनी म्हटलं. (Marathi Tajya Batmya)

Arvind kejriwal
Moscow Attack: इस्लामिक स्टेटचा हल्ला पुतिन घेणार बदला! मॉस्को हल्ल्याबाबत आतापर्यंत काय माहिती आहे?

कोण आहे शरदचंद्र रेड्डी?

केजरीवालांना दोन दिवसांपूर्वी या तथाकथित घोटाळा प्रकरणात अटक झाली. ही कारवाई ही केवळ एकाच व्यक्तीच्या विधानावर झालेली आहे. ही व्यक्ती आहे शरदचंद्र रेड्डी. अरोबिंदू फार्मा या औषध बनवणाऱ्या कंपनीचे ते मालक आहेत. यांच्याकडं इतरही काही कंपन्या आहेत. त्यापैकी दोन महत्वाच्या कंपन्या आहेत, एटीएल हेल्थकेअर, युजीआय फार्मा. (Latest Maharashtra News)

Arvind kejriwal
Latest Marathi News Update : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

रेड्डींनी काय केलं होतं विधान?

या शरदचंद्र रेड्डींना दिल्लीच्या अबकारी धोरणात दारुची काही दुकानं मिळाली, काही झोन मिळाले. चौकशी यंत्रणांनी त्यांची ९ नोव्हेंबर २०२२ रोजी चौकशीसाठी बोलावलं यावेळी त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की, मी कधीही केजरीवालांना भेटलो नाही, त्यांच्याशी कधीही चर्चा झाली नाही. तसेच आपशी माझा कुठलाही संबंध नाही.

यानंतर त्यांनी दुसऱ्याच दिवशी ईडीनं अटक केली. अनेक महिने तुरुंगात राहिल्यानंतर त्यांनी आपलं स्टेटमेंट बदललं आणि त्यांनी सांगितलं की, मी केजरीवालांना भेटलो, माझी त्यांच्याशी मद्य घोटाळ्यात चर्चाही झाली त्यानंतर लगेचच रेड्डी यांना जामिनही मिळतो. पण हे केवळ स्टेटमेंटच आहे, पण या घोटाळ्यातील पैसा कुठे आहे? अशी माहिती यावेळी आतिषी यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.