Arvind Kejriwal: अरविंद केजरीवालांना मोठा धक्का! कोर्टात हजर झाल्यानंतर CBI ने केली अटक

Arvind Kejriwal Arrested by CBI: दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे वकील विक्रम चौधरी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजर झाले, त्यांनी सांगितले की केजरीवाल यांना अन्य एका प्रकरणात न्यायालयीन कोठडीत असताना अटक करण्यात आली आहे.
cm arvind kejriwal
cm arvind kejriwalSakal
Updated on

दिल्लीतील कथित दारू घोटाळा प्रकरणी तिहार तुरुंगात बंद असलेले मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना आज मोठा धक्का बसला आहे. सीबीआय आज त्याला घेऊन दिल्लीच्या राऊस एव्हेन्यू कोर्टात पोहोचली होती. सीबीआयने आज केजरीवाल यांना राऊस एव्हेन्यू न्यायालयाच्या सुट्टीतील खंडपीठासमोर हजर करून कोठडीची मागणी केली होती, जी न्यायमूर्ती अमिताभ रावत यांच्या खंडपीठाने स्वीकारली.

या प्रकरणात, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे वकील विक्रम चौधरी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजर झाले, त्यांनी सांगितले की केजरीवाल यांना अन्य एका प्रकरणात न्यायालयीन कोठडीत असताना अटक करण्यात आली आहे. या संदर्भात कोणताही आदेश काढण्यात आला आहे.

विक्रम चौधरी यांनी मुख्यमंत्र्यांना ताब्यात घेतल्याबद्दल चिंता व्यक्त केली आहे, आम्हाला अरविंद केजरीवाल यांच्या अटकेची माहिती मीडियाकडून मिळाली होती. सीबीआयने दाखल केलेल्या रिमांड अर्जाची प्रतही आम्हाला देण्यात यावी, अशी आमची मागणी असल्याचे केजरीवालांचे वकील म्हणाले.

cm arvind kejriwal
Rahul Gandhi : तुम्ही केलेल्या निर्व्याज प्रेमाबद्दल आभार..!;राहुल गांधी यांचे वायनाडच्या जनतेला भावनिक पत्र

सीबीआयने मंगळवारी तिहार तुरुंगात अरविंद केजरीवाल यांची चौकशी केली आणि दारू घोटाळ्याप्रकरणी त्यांचे जबाब नोंदवले. सीबीआयच्या अटकेनंतर आज सुप्रीम कोर्टात अरविंद केजरीवाल यांच्या याचिकेवर सुनावणी होणार आहे ज्यात त्यांनी उच्च न्यायालयाच्या जामिनावर स्थगिती देण्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली आहे.

अरविंद केजरीवाल यांना ईडीने 21 मार्च रोजी अटक केली होती, तेव्हापासून ते तुरुंगात आहेत. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी सर्वोच्च न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला होता.

cm arvind kejriwal
Arvind Kejriwal : ''कनिष्ठ न्यायालयाने विवेक वापरला नाही...'', केजरीवालांच्या जामीन अर्जावर हायकोर्टाने नेमकं काय म्हटलं?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.