Arvind Kejriwal Arrest : दिल्लीमध्ये राष्ट्रपती राजवट लागू शकते का? उपराज्यपालांकडे आहेत 'हे' अधिकार

Kejriwal Arrest Updates : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना मद्य धोरण प्रकरणामध्ये ईडीने गुरुवारी रात्री अटक केली. त्यानंतर केजरीवाल यांनी अटकेविरोधात सुप्रीम कोर्टात धाव घेतली. कोर्टाने स्पेशल बेंचकडे जाण्याचा सल्ला दिला, त्यापूर्वीच त्यांनी याचिका मागे घेतली. खालच्या कोर्टात सुनावणी होणार असल्याने ही याचिका मागे घेण्यात आली.
avrind kajriwal
avrind kajriwalesakal
Updated on

Kejriwal Arrest Updates : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना मद्य धोरण प्रकरणामध्ये ईडीने गुरुवारी रात्री अटक केली. त्यानंतर केजरीवाल यांनी अटकेविरोधात सुप्रीम कोर्टात धाव घेतली. कोर्टाने स्पेशल बेंचकडे जाण्याचा सल्ला दिला, त्यापूर्वीच त्यांनी याचिका मागे घेतली. खालच्या कोर्टात सुनावणी होणार असल्याने ही याचिका मागे घेण्यात आली.

अरविंद केजरीवाल यांचा जेलमधील मुक्काम वाढल्यानंतर पुढे काय होणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे. केजरीवाल राजीनामा देणार का? राजीनामा दिला नाही तर सरकार कसं चालेल? दिल्लीत राष्ट्रपती राजवट लागू होणार का? असे प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहेत.

avrind kajriwal
Arvind Kejriwal: "केजरीवालच घोटाळ्याचे सूत्रधार, हवालाद्वारे गोवा निवडणुकीसाठी पाठवले 45 कोटी"; ईडीने कोर्टात कोणते केले दावे?

दिल्ली एक केंद्रशासित प्रदेश असल्याने उपराज्यपाल विनय सक्सेना यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. कायद्यामध्ये उपराज्यपाल यांना असे अधिकार आहेत, ज्यामध्ये संवैधानिक यंत्रणेला खोडा निर्माण झाला किंवा घटनात्मक पेच निर्माण झाला; अशी परिस्थिती निर्माण झाली तर उपराज्यपाल हे राष्ट्रपती राजवटीची शिफारस करु शकतात. लोकप्रतिनिधी कायदा १९५१ च्या सेक्शन २३९ एबी मध्ये एलजींना हे अधिकार देण्यात आलेले आहेत.

कोणाच्या काळात किती वेळा राष्ट्रपती राजवट?

  • नरेंद्र मोदी- ८

  • मनमोहन सिंह- १०

  • पीव्ही नरसिंह राव- ११

  • राजीव गांधी- ६

  • इंदिरा गांधी- ४८

  • जवाहरलाल नेहरु- ७

avrind kajriwal
Election Story: 'संपूर्ण क्रांती'चा नारा अन् बिगर काँग्रेसी सरकार सत्तेत! वाचा निवडणुकीतील घोषणांचे रंजक किस्से

कोणत्या राज्यात कधी लागू झाली राष्ट्रपती राजवट?

  • महाराष्ट्र- २८ सप्टेंबर २०१४ ते ३१ ऑक्टोबर २०१४

  • अरुणाचल प्रदेश- २६ जानेवारी २०१६ ते १९ फेब्रुवारी २०१६

  • उत्तराखंड- २७ मार्च २०१६ ते ११ मे २०१६

  • महाराष्ट्र- १२ नोव्हेंबर २०१६ ते २३ नोव्हेंबर २०१९

  • जम्मू-काश्मीर- ९ जानेवारी २०१६ ते १ मार्च २०१५

  • जम्मू-काश्मीर- ८ जानेवारी २०१६ ते ४ एप्रिल २०१६

  • जम्मू-काश्मीर- १९ फेब्रुवारी २०१८ ते ३१ ऑक्टोबर २०१९

  • पुद्दुचेरी- २३ फेब्रुवारी २०२१ ते ५ मे २०२१

मुख्यमंत्र्यांना अटक होऊ शकते का?

घटनेच्या कलम ३६१ अन्वये राष्ट्रपती किंवा राज्यपाल यांना ते पदावर असेपर्यंत अटक किंवा नजरकैदेत ठेवता येत नाही. त्याच्या विरोधात कोणतेही न्यायालय आदेश काढू शकत नाही.

पण पंतप्रधान, मुख्यमंत्री, मंत्री, खासदार किंवा आमदार यांना अशी सूट नाही. दिवाणी प्रक्रिया संहितेच्या कलम 135 नुसार पंतप्रधान, केंद्रीय मंत्री, लोकसभा आणि राज्यसभेचे सदस्य, मुख्यमंत्री, विधानसभा आणि विधानपरिषदेचे सदस्य यांना केवळ दिवाणी प्रकरणांमध्ये अटकेपासून सूट आहे. गुन्हेगारी प्रकरणांमध्ये नाही.

ईडी कथित दारू घोटाळ्यातील मनी लाँड्रिंगचा तपास करत असून हे एक गुन्हेगारी प्रकरण आहे. त्यामुळे मुख्यमंत्री केजरीवाल यांना अटक करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.