Arvind Kejriwal : "...तर विधानसभा निवडणुकीत मी भाजपचा प्रचार करेन"; नेमकं काय म्हणले केजरीवाल?

Arvind Kejriwal on Delhi Assembly Election 2024 : आम आदमी पक्षाचे (आप) नेते अरविंद केजरीवाल यांनी रविवारी आयोजित करण्यात आलेल्या ‘जनता दरबार' मध्ये बोलताना भाजपला आव्हान दिले आहे.
Delhi CM Arvind Kejriwal
Delhi CM Arvind Kejriwal
Updated on

नवी दिल्ली, ता. ६ ः ‘‘देशातील २२ राज्यांमध्ये भाजपची सरकारे आहेत. या राज्यांमध्ये तेथील सरकारांनी वीज-पाणी मोफत दिले तर दिल्लीच्या आगामी विधानसभा निवडणुकीत मी भाजपचा प्रचार करेन’’, असे आम आदमी पक्षाचे (आप) नेते अरविंद केजरीवाल यांनी रविवारी आयोजित करण्यात आलेल्या ‘जनता दरबार' मध्ये सांगितले.

‘‘भाजपचे डबल इंजिन खराब होत चालले आहे. एक इंजिन गेल्या जून महिन्यात लोकसभा निवडणुकीनंतर खराब झाले आहे, तर विविध राज्यांतील त्यांची सरकारे जाऊ लागली आहेत. डबल इंजिनचा अर्थ महागाई, भ्रष्टाचार आणि बेरोजगारी हे लोकांच्या लक्षात आले आहे,’’ असा टोला केजरीवाल यांनी यावेळी लगावला.

दिल्लीमध्ये पुढील काही महिन्यात विधानसभा निवडणूक होणार आहे. हे लोक दिल्लीत डबल इंजिन सरकारच्या गप्पा मारतील. हरियानातसुद्धा डबल इंजिनचे सरकार होते. मग तेथील लोक यांच्यापासून दूर का जात आहेत? ते यावेळी दिल्लीकरांनी भाजप नेत्यांना विचारावे, असे आवाहन केजरीवाल यांनी जनतेला केले. ‘‘उत्तर प्रदेशात या लोकांचे सात वर्षांपासून डबल इंजिनचे सरकार आहे. तरीही लोकसभेत यांच्या जागा निम्म्याने कमी झाल्या आहेत. या राज्यात मागील सात वर्षांपासून दुप्पट लूट सुरू आहे. मणिपूरमध्ये सात वर्षांपासून भाजपचे सरकार आहे. मग मणिपूर का जळत आहे? या लोकांना देशाचे मणिपूर बनवायचे आहे, असा आरोपही त्यांनी केला.

Delhi CM Arvind Kejriwal
Video : शाळेच्या कॅम्पसमध्ये विद्यार्थ्यांनी गायलं 'अयि गिरि नन्दिनी'; नेटकरी झाले मंत्रमुग्ध, येथे पाहा Viral Video

‘भाजप गरिबांविरोधातील पक्ष’


केजरीवाल जे काम करीत आहेत, ते आम्ही देखील करणार आहोत, असे भाजपचे नेते दिल्लीकरांना सांगतील. मात्र २२ राज्यांत भाजपची सरकारे आहेत. त्याठिकाणी ते मोफत वीज-पाणी का देत नाहीत. त्यांनी ते मोफत करावे. मी स्वत: दिल्लीच्या निवडणुकीत भाजपचा प्रचार करेन, असे आव्हान केजरीवाल यांनी भाजपला दिले आहे. भाजपच्या गुजरात मॉडेलवर टीका करताना ते म्हणाले, ‘‘गुजरातमध्ये ३० वर्षांपासून भाजपचे सरकार सत्तेत आहे. मात्र. या राज्यात एकही शाळा धड नाही.’’ दिल्लीत अंडरवर्ल्डचा दबदबा निर्माण झाला असल्याचा आरोपही केजरीवाल यांनी केला.

Delhi CM Arvind Kejriwal
Vidhansbha Election : विधानसभेच्या रणधुमाळीत शरद पवारांची क्रेझ! राज्यभरातून मिळाले इच्छुकांचे 'इतके' अर्ज

भाजप हा गरिबांच्या विरोधातला पक्ष आहे, असे आरोप केजरीवाल यांनी यावेळी केला. ‘‘असंख्य लोकांची नोकरी या पक्षाने हिरावून घेतली. महिलांच्या सुरक्षेसाठी आम्ही बसमध्ये मार्शल नेमले, पण हे मार्शल काढून घेण्यात आले. देशाच्या राजधानीत रोज गोळीबार होत आहे. येथील लोकांचे जगणे मुश्कील झाले आहे,’’ असे आरोप केजरीवाल यांनी जनता दरबारमध्ये बोलताना केले.

दिल्ली हे एक असे ठिकाण आहे की, जिथे प्रखर उन्हाळा असतो. असे असूनही आप सरकारच्या धोरणामुळे येथील लोकांना चोवीस तास वीज मिळते व वीजेचे बिल शून्य येते. या उलट भाजपचे लोक गरिबांना त्रास देतात. मागील काही वर्षांपासून केंद्र सरकार दिल्लीतील झोपडपट्ट्या उद्‍ध्वस्त करीत आहे. सहा महिन्यांपूर्वी वृद्धांसाठीची पेन्शन योजना भाजपने बंद केली.
आतिशी, मुख्यमंत्री दिल्ली

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.