उत्तराखंड: पाच राज्यातील विधानसभा निवडणूकीच्या प्रचारा दरम्यान सत्ताधारी आणि विरोधक एकमेंकावर आरोप- प्रत्यारोपाच्या फैरी झाडत आहेत. दरम्यान आम आदमी (AAP) पार्टीचे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी काँग्रेस (Congress)आणि भाजपवर (BJP) निशाणा साधला आहे. गेल्या ११ वर्षात उत्तराखंडच्या (Uttarakhand) जनतेने भ्रष्टाचाराशिवाय काहीही पाहिले नाही अशी टीका केजरीवाल यांनी केली आहे. आज ते उत्तराखंडमध्ये प्रचारासा दरम्यान बोलत होते.
उत्तराखंडमध्ये काँग्रेसने १० वर्षे आणि भाजपने ११ वर्षे राज्य केले. या काळात उत्तराखंडच्या जनतेने भ्रष्टाचाराशिवाय काहीही पाहिले नाही. हे दोन्ही पक्ष उत्तराखंडच्या दुर्दशेला जबाबदार आहेत असा आरोप अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी केला आहे.
आज उत्तराखंडमधील सर्वात मोठी समस्या ही बेरोजगारीची आहे. जोपर्यंत बेरोजगारांना नोकरी मिळत नाही तोपर्यंत ५००० रुपये बेरोजगार भत्ता, १८ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या महिलांच्या खात्यात दरमहा १००० रुपये जमा होतील असे आश्वासन केजरीवालांनी दिले. २०२५ पर्यत जर मी यमुना स्वच्छ करू शकलो नाही तर मला मत देऊ नका असे मी दिल्लीकरांना ही सांगितले आहे असे ही ते म्हणाले.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.