दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना मद्य धोरणातील गैरव्यवहाराच्या संदर्भात झालेल्या भ्रष्टाचाराबाबत सक्तवसूली संचनालयाने काल अटक केली असून, त्यांना सहा दिवसांची कोठडी सुनावली आहे. केजरीवाल सरकारवर राजकारणाचे काळे ढग पसरले आहेत. विधानसभेत आम आदमी पक्षाचे बहुमत आहे. त्यातील एकूण 70 आमदारांपैकी तब्बल 62 आमदार आम आदमी पक्षाचे असून, उरलेले 8 आमदार भाजपचे आहेत.
आपचे इतके हुकमी बहुमत असूनही मोदी सरकारची पावले दिल्लीत राष्ट्रपती शासन लागू करण्याकडे पडत असून, त्यांना मदत करण्यासाठी नायब राज्यपाल विनय कुमार सक्सेना आदेशाची वाट पाहात आहेत. अर्थात तत्पूर्वी त्यांना दिल्लीतील कायदा व सुव्यवस्था बिघडली आहे, अशा स्वरूपाचा अहवाल केंद्राला पाठवावा लागेल. अटक होणारे केजरीवाल हे पहिले विद्यमान मुख्यमंत्री होत.