Arvind Kejriwal : दिल्लीच्या मंत्री आतिशी यांच्या निवासस्थानी पोलिस; नेमकं प्रकरण काय?

दिल्लीतील आम आदमी पक्षाच्या मंत्री आतिशी यांच्या निवासस्थानी रविवारी पुन्हा पोलिस दाखल झाले आहेत. आमदारांच्या कथित घोडेबाजार प्रकरणी त्यांना पोलिसांनी नोटीस दिली. याच प्रकरणात शनिवारी अरविंद केजरीवाल यांच्या स्टाफला नोटीस देण्यात आलेली होती.
Arvind Kejriwal
Arvind Kejriwal esakal
Updated on

MLA Poaching Case Delhi : दिल्लीतील आम आदमी पक्षाच्या मंत्री आतिशी यांच्या निवासस्थानी रविवारी पुन्हा पोलिस दाखल झाले आहेत. आमदारांच्या कथित घोडेबाजार प्रकरणी त्यांना पोलिसांनी नोटीस दिली. याच प्रकरणात शनिवारी अरविंद केजरीवाल यांच्या स्टाफला नोटीस देण्यात आलेली होती.

नेमकं प्रकरण काय?

मंत्री आतिशी यांनी पत्रकार परिषदेत भाजपने 25 कोटी रुपयांना आप आमदारांना विकत घेतल्याचा आरोप केला होता. तसेच, त्याची ऑडिओ क्लिप असल्याचा दावाही केलेला. याच प्रकरणात पोलिसांनी आतिशी यांना नोटीस दिली असून तपासात सहभागी होण्यास सांगितलं आहे. दिल्लीतील सरकार पाडण्यासाठी भाजपने आपल्या सात आमदारांना प्रत्येकी २५ कोटी रुपयांची ऑफर दिल्याचा आरोपही मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मागच्या आठवड्यात केला होता.

दरम्यान, अरविंद केजरीवाल यांच्या आरोपानंतर आम आदमी पक्षाच्या अडचणी वाढतानाच दिसत आहेत. शुक्रवारी अरविंद केजरीवाल यांच्या घरी दिल्ली पोलीस पोहचले होते. तर शनिवारीही दिल्ली पोलिसांच्या क्राईम ब्रँचची टीम केजरीवाल यांच्या घरी पोहचली होती. पोलिसांनी त्यांना नोटीस दिली आहे.

Arvind Kejriwal
Satyendra Bose : 'गॉड पार्टिकल'चे जनक म्हणून ओळखले जातात हे भारतीय वैज्ञानिक.. आईनस्टाईन देखील करायचे सलाम!

अरविंद केजरीवाल यांचा दावा काय आहे?

अरविंद केजरीवाल यांनी दावा केला होता की, भारतीय जनता पार्टी दिल्लीतील सरकार पाडण्यासाठी आम आदमी पार्टीचे आमदार फोडण्याचा प्रयत्न करत आहे. गेल्या आठवड्यात अरविंद केजरीवाल यांनी एका सोशल मीडिया पोस्टमध्ये दावा केला होता की त्यांच्या पक्षाच्या 7 आमदारांनी भाजपशी संपर्क साधला होता. भाजपने तात्काळ त्यांचे आरोप निराधार असल्याचे सांगत याप्रकरणी दिल्ली पोलिसांकडे तक्रार केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.