नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी सुप्रीम कोर्टानं दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना तात्पुरता जामीन मंजूर केला होता. २ जून रोजी त्यांची जामिनाची मुदत संपल्यानं ते पुन्हा पोलिसाना शरण आले.
पण पुन्हा तिहार तुरुंगात टाकल्यानंतर त्यांचा छळ करण्याच अद्याप थांबलेलं नाही. त्यांना वेगळ्या कोठडीत ठेवण्यात आलं असून तिथं दिल्लीतील प्रंचड तापमानातही त्यांच्यासाठी साधा कुलरही ठेवलेला नाही, असा आरोप आपच्या प्रवक्त्या आतिषी यांनी केला आहे. (Arvind Kejriwal surrende to tihar jail but he does not gives basic facility and cooler due to high temp in Delhi AAP Atishi attacked on Modi govt)
आतिषी यांनी पत्रकार परिषद घेत भाजपसह दिल्लीच्या नायब राज्यपालांवर गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी म्हटलं की, काल अरविंद केजरीवाल यांनी शरण येत ते पुन्हा तिहार तुरुंगात गेले आहेत. पण भाजपप्रणित केंद्र सरकारला अद्याप शांतता मिळालेली नाही. भाजप केजरीवालांना छळण्याची कोणतीच कसर सोडत नाहीएत.
केजरीवाल शरण आले त्यानंतर त्यांना एका कोठडीत ठेवण्यात आलं जिथं साध्या एका कुलरचीही व्यवस्था नाही. सध्या दिल्लीचं तापमान हे सुमारे ४८ ते ५० डिग्री सेल्सिअसमपर्यंत पोहोचलेलं असतानाही त्यांना योग्य सुविधा दिल्या जात नाहीएत. दुसरीकडं तिहार तुरुंगात कुख्यात गुन्हेगारांना देखील गरमीपासून दिलाशासाठी कुलरही व्यवस्था केली जाते. तिथं दिल्लीचे लोकप्रिय मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना या तापणाऱ्या उष्णतेच्या दिवसातही कुलर दिलेला नाही.
मला भाजपसह दिल्लीच्या नायब राज्यपालांना विचारायचं आहे की तुम्ही किती खालची पातळी गाठणार आहात. एखाद्याचा किती छळ करणार आहात? असा सवालही आतिषी यांनी केला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.