Arvind Kejriwal : अबब! नुसता राजेशाही थाट; मुख्यमंत्र्यांच्या घरातला एक पडदा ८ लाखांचा

मुख्यमंत्र्यांच्या घराचं रिनोव्हेशन आता वादात सापडलं आहे.
Arvind Kejriwal demands delhi independent state once again
Arvind Kejriwal demands delhi independent state once againSakal
Updated on

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या बंगल्याच्या नूतनीकरणाचं प्रकरण तापलं आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अरविंद केजरीवाल यांच्या बंगल्याच्या नूतनीकरणावर सुमारे ४५ कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत.

टाईम्स नाऊ नवभारत या वाहिनीनुसार, मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी 8-8 लाख रुपयांचा एक पडदा लावण्यात आला आहे. त्याचवेळी फरश्या बसवण्यासाठी १ कोटींहून अधिक खर्च झाला.

घरात पसरलेल्या कार्पेटची किंमत लाखोंची आहे; याबाबत भाजपने सध्या केजरीवाल यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे. केजरीवाल यांचा प्रामाणिकपणा उघड झाल्याचं भाजप नेत्यांचं म्हणणं आहे. कोरोना विषाणूच्या साथीच्या काळात घराच्या सजावटीवर एवढा मोठा निधी खर्च करण्यात आला, असंही म्हटलं आहे. भाजपनेही केजरीवाल यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

Arvind Kejriwal demands delhi independent state once again
Arvind Kejriwal: केजरीवालांची होतेय हेरगिरी? मुख्यमंत्र्यांच्या घराजवळ ड्रोन दिसल्यानं खळबळ

केजरीवाल यांच्या बंगल्यातील एका पडद्याची किंमत ८ लाख रुपये आहे आणि असे २३ पडदे मागवण्यात आले आहेत. १ कोटी १५ लाख किमतीचे मार्बल व्हिएतनाममधून आयात करण्यात आलं असून ४ कोटी किमतीचे प्री-फॅब्रिकेटेड लाकूड बसवण्यात आलं आहे. घरातील कामासाठी पहिली मंजुरी १ सप्टेंबर २०२० रोजी देण्यात आली होती.

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दस्तऐवजांमध्ये दिलेल्या तपशीलानुसार सिव्हिल, इलेक्ट्रिकल आणि प्लंबिंगच्या कामांव्यतिरिक्त, विविध वॅटेज आणि आकाराचे स्मार्ट लाइटिंग फिक्स्चर (2,446 फिक्स्चर), पंखे (80 पंखे), आणि डंबवेटर लिफ्ट (अन्नासाठी) वितरण) एकूण खर्चाचा भाग आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.