Atishi Marlena : ''पक्षात या नाहीतर जेलमध्ये जा'', आपच्या आणखी 'या' चार नेत्यांना होऊ शकते अटक; आतिशी यांचा दावा

''येणाऱ्या दोन महिन्यात, लोकसभा निवडणुकीच्या अगोदर भाजपच्या चार नेत्यांना अटक करण्याचं नियोजन केलं जात आहे. माझ्यासह सौरभ भारद्वाज यांना अटक होऊ शकते. तसेच दुर्गेश पाठक आणि राघव चड्डा यांनाही अटक होऊ शकते, असं त्यांनी सांगितलं.''
Atishi Marlena
Atishi Marlenaesakal
Updated on

Arvind Kejriwal Arrest Updates : दिल्ली सरकारमधी मंत्री आतिशी यांनी पत्रकार परिषदेत एक गौप्यस्फोट केला आहे. माझ्या जवळच्या लोकांच्या माध्यमातून मला भाजपमध्ये प्रवेश करण्याचा दबाव आणला जात असल्याचं त्यांनी म्हटलंय.

आतिशी म्हणाल्या की, पुढच्या काही दिवसांमध्ये आपच्या आणखी काही नेत्यांना अटक केली जाईल. पंतप्रधान मोदी आणि भाजपने आप नेत्यांना संपवण्याचा निश्चय केला आहे. आपचे वरिष्ठ नेते अटकेत आहेत, परंतु रविवारी रामलीला मैदानावर लाखो आले आणि रस्त्यावर उतरुन भाजपचा निषेध केला. त्यावरुन पुढच्या काही दिवसांत आपचे नेते अटक होतील, असं दिसून येतंय.

Atishi Marlena
Harassment: प्राध्यापकांकडून विद्यार्थीनीचा लैंगिक छळ! इंजिनिअरिंगच्या पहिल्या वर्षात शिकणाऱ्या मुलीची आत्महत्या

आम आदमी पक्षाच्या चार मोठ्या नेत्यांना जेलमध्ये टाकलं जाईल आणि पुढच्या काही दिवसांमध्ये माझ्या खासगी निवासस्थानी ईडीची रेड होईल. माझं कुटुंब आणि नातेवाईकांच्या घरी छापा पडू शकतो. आमच्या सगळ्यांना समन्स पाठवलं जाईल आणि पुन्हा अटक केली जाईल, अशी शंका आतिशी यांनी बोलून दाखवली.

'या' चार नेत्यांना होऊ शकते अटक

आतिशी यांनी पुढे सांगितलं की, येणाऱ्या दोन महिन्यात, लोकसभा निवडणुकीच्या अगोदर भाजपच्या चार नेत्यांना अटक करण्याचं नियोजन केलं जात आहे. माझ्यासह सौरभ भारद्वाज यांना अटक होऊ शकते. तसेच दुर्गेश पाठक आणि राघव चड्डा यांनाही अटक होऊ शकते, असं त्यांनी सांगितलं.

Atishi Marlena
Saree Cancer: भारतीयांमध्ये वाढत चाललाय 'साडी कॅन्सर'चा धोका; नेमका काय आहे हा प्रकार? जाणून घ्या

''मी आज भारतीय जनता पक्षाला हे सांगू इच्छिते की, आम्ही तुमच्या धमक्यांना घाबरत नाहीत. आम्हीसुद्धा भगत सिंगांचे चेले आहोत, केजरीवाल यांचे शिपाई आहोत. जोपर्यंत आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये शेवटचा श्वास शिल्लक आहे, तोपर्यंत अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वात देश वाचवण्याचं काम करत राहणार आहोत. तुम्ही प्रत्येक आमदाराला जेलमध्ये टाका, त्याच्या जागेवर आणखी १० जण लढण्यासाठी सज्ज होतील.'' असा इशारा आतिशी यांनी दिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.