नवी दिल्ली : हे सर्व भ्रष्ट लोक मिळून मला दहशतवादी म्हणत आहेत. ज्याला ते दहशतवादी म्हणतात त्यानी आज १२,३४० स्मार्ट क्लासरूम देशाला समर्पित केल्या आहेत. येथे आता अधिकारी, न्यायाधीश, रिक्षावाले, मजूर यांची मुले एकाच डेस्कवर बसून अभ्यास करतील. त्यांचा दहशतवादी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि भगतसिंग यांची स्वप्नं पूर्ण करीत आहे, असे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) म्हणाले.
अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी शनिवारी (ता. १९) रजोकरी येथील राजकीय कन्या विद्यालय राष्ट्रीय राजधानीतील २४० सरकारी शाळांमधील १२,४३० नवीन स्मार्ट क्लासरूमचे उद्घाटन केले. यावेळी उपमुख्यमंत्री आणि शिक्षण मंत्री मनीष सिसोदिया आणि दिल्लीचे गृहमंत्री सत्येंद्र जैन उपस्थित होते. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ट्विटद्वारे स्मार्ट क्लासरूमची माहिती दिली. सरकारने बांधलेल्या नवीन इमारतीच्या वैशिष्ट्यांमध्ये वर्गखोल्यांमधील डिझायनर डेस्क, ग्रंथालय, कार्यक्रम आयोजित करण्यासाठी बहुउद्देशीय हॉल यांचा समावेश आहे, असे पक्षाच्या निवेदनात म्हटले आहे.
देशातील सर्व भ्रष्ट लोक आमच्या विरोधात एकत्र आले आहेत. आज आम्ही १२,४३० अत्याधुनिक वर्गखोल्या सुरू करून चोख प्रत्युत्तर देऊ. हा देश या भ्रष्ट लोकांपुढे झुकणार नाही. आता देशाने ठरवले आहे. आता देश पुढे जाईल. बाबासाहेब आणि भगतसिंग यांची स्वप्ने पूर्ण होतील, असे अरविंद केजरीवाल ट्विट करून म्हणाले.
मी असा दहशतवादी आहे जो रुग्णालये, शाळा आणि रस्ते बनवतो
कवी आणि आपचे माजी नेते कुमार विश्वास यांनी आप प्रमुख अरविंद केजरीवाल यांच्यावर गंभीर आरोप केले होते. त्यानंतर केजरीवाल म्हणाले की, पंजाबमधील विरोधक त्यांच्या पक्षाविरोधात एकवटले आहेत. खलिस्तानशी संबंधित आरोपावर स्वतःला सर्वांत मोठा गोड दहशतवादी असल्याचे अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी सांगितले. मी असा दहशतवादी आहे जो रुग्णालये, शाळा आणि रस्ते बनवतो. वडीलधाऱ्यांना यात्रेला पाठवतो आणि लोकांना मोफत वीज देतो. कुमार विश्वास यांनी दावा केला होता की, एकदा केजरीवाल यांनी त्यांना सांगितले होते की, जर ते पंजाबचे मुख्यमंत्री झाले नाहीत तर ते आझाद देशाचे (खलिस्तान) पंतप्रधान होतील.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.