Arvind Kejriwal: दिल्लीत INDIA आघाडीच्या बैठकीत केजरीवाल अनुपस्थित राहण्याची शक्यता; नेमकं कारण काय?

Arvind Kejriwal
Arvind KejriwalEsakal
Updated on

Arvind Kejriwal: दिल्लीत होणाऱ्या इंडिया आघाडीच्या बैठकीला दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल अनुपस्थित राहण्याची शक्यता आहे. केजरीवाल 19 ते 30 डिसेंबर दरम्यान विपश्यनेसाठी जाणार आहेत.

विपश्यनेच्या पहिल्याच दिवशी इंडिया आघाडीची बैठक आहे. 5 राज्यांच्या निवडणुकीदरम्यान आप आणि काँग्रेसमध्ये चांगलेच खटके उडाले. त्यामुळे या बैठकीत 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकीची चर्चा होऊन पुढची रणनीती ठरवण्यावर चर्चा होणार होती. मात्र केजरीवाल या बैठकीला उपस्थित नसणार.

अरविंद केजरीवाल पुन्हा एकदा विपश्यनेसाठी जात आहेत. यावेळी मुख्यमंत्री 19 डिसेंबरला विपश्यनेसाठी रवाना होतील. केजरीवाल दरवर्षी 10 दिवसांचा विपश्यनेचा कोर्स करण्यासाठी जातात. यावर्षीही आम्ही 19 ते 30 डिसेंबरपर्यंत विपश्यनेत राहू, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.

Arvind Kejriwal
Maratha Reservation : "घटना दुरुस्ती करा.." मराठ्यांना शाश्‍वत आरक्षणासाठी आमदार तनपुरे यांची मोठी मागणी

2021 मध्ये केजरीवाल विपश्यनेसाठी जयपूरमधील एका वेलनेस सेंटरमध्ये गेले होते. या काळात केजरीवाल कोणत्याही राजकीय कार्यक्रमात सहभागी होत नाहीत. तसेच आम आदमी पक्षाच्या कोणत्याही नेत्याला किंवा पदाधिकाऱ्याला भेटत नाही. मुख्यमंत्र्यांनी धरमकोट, नागपूर आणि बंगळुरू येथे अनेक विपश्यना सत्रांमध्ये भाग घेतला आहे. (Latest Marathi News)

Arvind Kejriwal
Devendra Fadnavis: "९ ते १० महिने पक्षासाठी द्या"; देवेंद्र फडणवीसांचे जागावाटपावर भाजप पदाधिकाऱ्यांना आश्वासन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.