Swati Maliwal: '...तर सिसोदिया आज इथं असते...', आपच्या मोर्चाच्या निर्णयानंतर स्वाती मालीवाल यांचं ट्विट

Swati Maliwal: दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आज आपल्या पक्षातील नेत्यांसोबत आणि कार्यकर्त्यांसोबत भाजपच्या मुख्यालयावर धडक मोर्चा काढणार आहेत. त्याच्या या निर्णयावर आपच्या खासदार स्वाती मालीवाल यांनी सोशल मिडीयावर पोस्ट केली आहे.
Swati Maliwal
Swati MaliwalEsakal
Updated on

Swati Maliwal: दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आज आपल्या पक्षातील नेत्यांसोबत आणि कार्यकर्त्यांसोबत भाजपच्या मुख्यालयावर धडक मोर्चा काढणार आहेत. त्याच्या या निर्णयावर आपच्या खासदार स्वाती मालीवाल यांनी सोशल मिडीयावर पोस्ट केली आहे. त्यांनी लिहिले, 'मनीष सिसोदिया यांच्यासाठी खूप मेहनत घेतली असती, तर ते इथे असते कदाचित माझ्यासोबत इतकं वाईट घडलं नसतं!

आपच्या खासदार स्वाती मालीवाल यांच्यासोबत घडलेल्या घटनेनंतर मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या पीए बिभव कुमार यांनी अटक करण्यात आली आहे. त्याविरोधात आज अरविंद केजरीवाल आज आपच्या नेते, कार्यकर्त्यांसह रस्त्यावर उतरणार आहेत. केजरीवाल आज भाजपच्या मुख्यालयावर मोर्चा काढणार आहेत. शनिवारी केजरीवालांनी भाजपला अटकेवरून आव्हान दिलं होतं. अशातच स्वाती मालीवाल यांनी अरविंद केजरीवाल यांच्यावर अप्रत्यक्षपणे टीका केली आहे.

Swati Maliwal
Arvind Kejriwal : केजरीवाल पुन्हा रस्त्यावर;‘आप’चा मोर्चा आज भाजप मुख्यालयावर धडकणार

स्वाती मालीवाल यांनी सोशल मिडीया एक्सवर पोस्ट करत म्हटले आहे की,'एकेकाळी निर्भयाला न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही सर्वजण रस्त्यावर उतरायचो, आज 12 वर्षांनंतर आम्ही रस्त्यावर उतरत आहोत. पण तेही अशा व्यक्तीसाठी ज्याने सीसीटीव्ही फुटेज गायब केले. फोन format केला? मनीष सिसोदिया यांच्यासाठी इतका जोर लावला असता. तर ते इथे असते कदाचित माझ्यासोबत इतकं वाईट घडलं नसतं!' स्वाती मालीवाल यांनी आपल्या पोस्टच्या माध्यमातून अप्रत्यक्षपणे केजरीवालांना टोला लगावला आहे.

Swati Maliwal
Swati Maliwal Assault Case: केजरीवालांच्या पीएला ५ दिवसांची पोलीस कोठडी, न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला

दरम्यान, स्वाती मालीवाल यांच्यावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी काँग्रेस नेते संदीप दीक्षित यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. संदीप दीक्षित म्हणाले, 'स्वाती मालीवाल आणि बिभव कुमार यांच्यात नेमके काय झाले हे केवळ तपासातच समोर येईल. जेव्हा निर्भयाची घटना घडली तेव्हा आप रस्त्यावर उतरली आणि म्हणाले की जर एखाद्या महिलेचे काही चुकीचे घडले तर आरोपीला स्वतःला सिद्ध करावे लागेल की तो निर्दोष आहे...त्यामुळेच असा कायदा करण्यात आला आणि आता जेव्हा एखादी महिला आपल्यासोबत काही चुकीचे घडले आहे असे म्हणते, तेव्हा ती योग्य आहे असे समजून कारवाई केली जाते... बिभव कुमार यांना याच नियमानुसार अटक करण्यात आली आहे... हा 'आप'चा नियम आहे. हा कायदा चुकीचा आहे, असे आम्ही यापूर्वीही म्हटले होते.

Swati Maliwal
Arvind Kejriwal: "आम्ही भाजपच्या मुख्यालयात येतोय हिंमत असेल तर..."; केजरीवालांचं पंतप्रधान मोदींना थेट आव्हान

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.