Latest New Delhi News: ‘मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीची मला आस नाही आणि पैसेही मिळवायचे नाहीत, त्यामुळे भाजपचे लोक जेव्हा मला चोर आणि भ्रष्टाचारी म्हणून संबोधतात तेव्हा मला दु:ख होते,’’ अशी खंत दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे (आप) नेते अरविंद केजरीवाल यांनी रविवारी ‘जनता की अदालत’ या कार्यक्रमात बोलताना सांगितले. जंतर-मंतरवर आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमास पक्षाचे वरिष्ठ नेते, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.