Arvind Kejriwal Arrest : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे सध्या कथित मद्य घोटाळा प्रकरणीत ईडी आणि सीबीआयच्या रडारावर आहेत. यादरम्यान त्यांची चौकशी सुरू असून मागील १० दिवासांपासून केजरीवाल कोठडीत आहेत. यादरम्यान ईडीने अकविंद केजरीवाल यांनी चौकशीदरम्यान आपचे दोन नेते आतिशी आणि सौरभ भारद्वाज यांची नावे घेतल्याचा दावा केला आहे.
ईडीने दिलेल्या माहितीनुसार, आपचे सर्वेसर्वा केजरीवाल यांनी सांगितलं की, विजय नायर हे त्यांना (केजरीवाल) रिपोर्ट करत नव्हता, तर तो आतिशी आणि सौरभ भारद्वाज यांना रिपोर्ट करत असे. तसेच त्यांचे विजय नायरशी संबंध मर्यादीत होता. विजय नायर हे 'आप'चे माजी कम्युनिकेशन-इनचार्ज आणि मद्य धोरण प्रकरणातील आरोपींपैकी एक आहेत.
दरम्यान अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखाली दिल्ली सरकराकडून मद्य धोरण तयार करताना कथितरित्या भ्रष्टाचार झाल्याच्या प्रकरणाची चोकशी ईडी आणि सीबीआय या दोन्हीकडून केली जात आहे.
दिल्लीच्या राऊज एव्हेन्यू कोर्टात या प्रकरणी सुनावणी झाली. यावेळी केजरीवाल यांनी ईडीच्या चौकशीदरम्यान सांगितले की विजय नायर त्यांना नव्हे तर आतिशी आणि सौरभ भारद्वाज यांना रिपोर्ट करत होते. विशेष बाब म्हणजे जेव्हा ईडी कोर्टात ही माहिती देत असताना केजरीवाल यांनी याचा विरोध देखील केला नाही, आणि ते गप्प राहिले. यासोबतच विशेष बाब म्हणजे आतिशी गोवा विधानसभा निवडणुकीदरम्यान गोव्याच्या प्रभारी देखील राहिल्या आहेत.
ईडीच्या आरोपपत्रात मीडिया प्राभारी विजय नायर यांच्यावर साउथ ग्रुप यांच्यात मध्यस्थ म्हणून काम केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. ज्यांनी कथितरित्या दिल्ली मद्य विक्रेत्यांना प्रवेश मिळावा यासाठी केजरीवाल सरकारला १०० कोटी रुपयांची लाच दिली होती.
ईडीने शुक्रवारी दिल्लीच्या कोर्टात आपल्या रिमांड अर्जात आरोप केला की केजरीवाल दिल्ली मद्य धोरण घोटाळ्याचे सूत्रधार असल्याचे म्हटले आहे. तसेच तेच थेट स्वरुपात या धोरणाची निर्मीती, लाच मागणे आणि गुन्ह्यातून मिळालेल्या संपत्तीचे व्यवस्थापन करणे यामध्ये सहभागी होते. मात्र केजरीवाल यांनी हे आरोप फेटाळले आहेत आणि या कथित घोटाळ्याशी त्यांचा संबंध दाखवणारा कुठलाही पुरावा नसल्याचे म्हटले आहे.
अरविंद केजरीवाल यांना १५ दिवसांची न्यायालयीन कोठडी
अरविंद केजरीवाल यांना राउज एव्हेन्यू कोर्टाने १५ दिवसांच्या न्यायालयीन कठडी सुनावली आहे, त्यांना १५ एप्रिल पर्यंत दिल्लीच्या तिहार जेलमध्ये ठेवण्यात येणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.