Arvind Kejriwal: मोदींच्या शिक्षणासंबंधी टिपण्णी; केजरीवालांविरोधातील समन्स रद्द करण्यास कोर्टाचा नकार
Narendra Modi: ‘आप’ नेते आणि राज्यसभेचे खासदार संजय सिंह यांनी दाखल केलेली अशाच प्रकारची याचिका याआधी रद्द करण्यात आल्याची टिप्पणी न्यायाधीश ऋषीकेश रॉय आणि न्यायाधीश एस. व्ही. एन. भट्टी यांच्या खंडपीठाने सुनावणी दरम्यान केली.
नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पदवीशी संबंधित अवमाननाप्रकरणी ‘आप’ नेते अरविंद केजरीवाल यांच्याविरोधात जारी असलेले समन्स रद्द करण्यास सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी नकार दिला.