Arvind Kejriwal News : बिहारनंतर आता दिल्लीत राजकीय भूकंप? ते सात आमदार कोण? पोलिसांचा केजरीवालांना सवाल

Arvind Kejriwal Latest News : काही दिवसांपूर्वी बिहारच्या राजकारणात भूकंप घडवत नितीश कुमार एनडीएमध्ये सामील झाले. यानंतर आता दिल्लीतील आम आदमी पक्षाचे सरकार देखील कोसळणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे
arvind kejriwal on delhi police crime branch notice BJP poaching aap mla horse trading
arvind kejriwal on delhi police crime branch notice BJP poaching aap mla horse trading
Updated on

Arvind Kejriwal Latest News : काही दिवसांपूर्वी बिहारच्या राजकारणात भूकंप घडवत नितीश कुमार एनडीएमध्ये सामील झाले. यानंतर आता दिल्लीतील आम आदमी पक्षाचे सरकार देखील कोसळणार का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. याला कारण हे भाजपकडून आपचे आमदार फोडण्याचा प्रयत्न होत असल्याचा अरविंद केजरीवाल यांनी केलेला आरोप हे आहे.

दरम्यान केजरीवाल यांच्या या आरोपानंतर दिल्ली सीएम अरविंद केजरीवाल आणि आम आदमी पक्ष यांच्या अडचणी वाढतानाच दिसत आहेत. शुक्रवारी अरविंद केजरीवाल यांच्या घरी दिल्ली पोलीस पोहचले होते. तर शनिवारी दिल्ली पोलिस क्राइम ब्रँचची टीम केजरीवाल यांच्या घरी पोहचली आणि पाच तासांनंतर परतली. यादरम्यान दिल्ली पोलीसांनी एक नोटीस देखील पाठवली आहे, जी सीएम ऑफसमध्ये देण्यात आली आहे. दिल्लीत नेमकं चाललंय तरी काय असा प्रश्न सर्वांना पडला आहे.

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी भाजपवर आमदार खरेदी करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला होता. यानंतर आता दिल्ली पोलीस मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी पोहचले आणि त्यांना नोटीस बजावली आहे. इतकेच नाही तर पोलीसांची टीम आप सरकारमधील मंत्री आतिशी यांच्या घरी देखील नोटीस पाठवणार आहेत.

arvind kejriwal on delhi police crime branch notice BJP poaching aap mla horse trading
Ganpat Gaikwad Firing Video : आधी गोळ्या झाडल्या अन् मग... पोलीस स्टेशनमध्ये नेमकं काय घडलं? घटनेचा थरारक व्हिडीओ आला समोर

तीन दिवसात उत्तर द्यावे लागणार....

मिळालेल्या माहितीनुसार मुख्यमंत्री निवास्थान येथे शनिवारी दिल्ली पोलीसांच्या क्राइम ब्रांचची टीम पोहचली होती. यावेळी टीम पाच तास तेथे होती. यानंतर क्राइम ब्रांचने मुख्यमंत्री कार्यालयात नोटीस दिली आहे. या नोटीसीचे उत्तर पुढील तीन दिवसात मागण्यात आले आहे. या नोटीसीत दोन मुख्य प्रश्न विचारण्यात आले आहेत. १) तुम्ही आरोप करत आहात त्यासाठी कोणता पुरावा आहे? २) त्या सात आमदारांची नावे सांगा, ज्यांच्या आधारावर तुम्ही आरोप करत आहात.

arvind kejriwal on delhi police crime branch notice BJP poaching aap mla horse trading
FASTag KYC Deadline : फास्टॅग वापरकर्त्यांना मोठा दिलासा! सरकारने वाढवली KYCची मुदत; झटपट 'असे' करा अपडेट

अरविंद केजरीवाल यांचा दावा काय आहे?

अरविंद केजरीवाल यांनी अलीकडेच दावा केला होता की, भारतीय जनता पार्टी दिल्लीतील सरकार पाडण्यासाठी आम आदमी पार्टीचे आमदार फोडण्याचा प्रयत्न करत आहे. या संदर्भात दिल्ली गुन्हे शाखेचे अधिकारी शुक्रवारी केजरीवाल यांना नोटीस देण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी पोहोचले, मात्र ते उपस्थित नव्हते. या नोटीसीमध्ये केजरीवाल यांनी केलेल्या आरोपांवर पुरावा मागण्यात आला आहे.

गेल्या आठवड्यात अरविंद केजरीवाल यांनी एका सोशल मीडिया पोस्टमध्ये दावा केला होता की त्यांच्या पक्षाच्या 7 आमदारांनी भाजपशी संपर्क साधला होता. भाजपने तात्काळ त्यांचे आरोप निराधार असल्याचे सांगत याप्रकरणी दिल्ली पोलिसांकडे तक्रार केली.

२७ जानेवारी रोजी एक्स वर पोस्ट करत अरविंद केजरीवाल यांनी दावा केला होता की, काही दिवसांपूर्वी आमच्या दिल्लीतील ७ आमदारांशी संपर्क साधण्यात आला आणि सांगितले की - काही दिवसांनी केजरीवाल यांना अटक करतील. त्यानंतर आमदार फोडू. २१ आमदारांशी बोलणं झालं आहे. इतरांशी देखील बोलणी सुरू आहे. यानंतर दिल्लीतील आम आदमी पक्षाचे सरकार पडण्यात येईल. तुम्ही देखील या. २५ कोटी रुपये देऊ आणि भाजपच्या तिकीटावर निवडणूक लढवण्याची संधी मिळेल.

arvind kejriwal on delhi police crime branch notice BJP poaching aap mla horse trading
Ganpat Gaikwad Firing : हे काही पहिल्यांदाच नाही! भाजप आमदाराच्या फायरिंगनंतर आदित्य ठाकरेंनी यादीच सांगितली

दरम्यान आज अरवींद केजरीवाल यांनी पुन्हा एक्सवर एक पोस्ट केली आहे. ज्यामध्ये त्यांनी "मला क्राइम ब्रांचच्या या पोलीस अधिकाऱ्यांबद्दल सहानुभूती आहे. यांचा काय दोष? यांचं काम आहे दिल्लीतील गुन्हे रोखणं. पण त्यांना त्याएवजी अशी नकली कारवाई करवून घेतली जात आहे. यामुळेच दिल्लीत इतके गुन्हे वाढत आहेत.

यांचे राजकीय बॉस मला विचारत आहेत की 'आप"च्या कोणत्या आमदारांना फोडण्याचा प्रयत्न करण्यात आला? पण माझ्यापेक्षी ते तुम्हाला अधिक चांगल्या प्रकारे माहिती आहे? तुम्हाला सर्वकाही माहिती आहे. फक्त दिल्लीच का संपूर्ण देशात मागील काही वर्षात दुसऱ्या पक्षातील कोणकोणते आमदार फोडून सरकारे पाडण्यात आली, याबद्दल तुम्हाला सगळं माहिती आहे? मग हे नाटक कशाला?" असा सवाल केजरीवाल यांनी केला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.