काश्मीरमध्ये जे घडतयं त्याने भारतीयांच्या मनात राग अन् चिंता : केजरीवाल

'आज पुन्हा काश्मिरी पंडित आपली जन्मभूमी सोडण्यासाठी तयार झाले आहेत.'
Arvind Kejriwal News
Arvind Kejriwal Newsesakal
Updated on

दिल्ली : काश्मीरमध्ये जे काही घडत आहे, त्याने प्रत्येक भारतीयांच्या मनात राग आणि चिंता आहे, असे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल म्हणाले. काश्मीरमध्ये सुरु असलेल्या हत्यासत्रांविरोधात आम आदमी पक्षाच्या वतीने दिल्लीत (Delhi) आज रविवारी (ता.पाच) निदर्शने करण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. पुढे केजरीवाल म्हणाले, काश्मिरी पंडितांची निवडून हत्या केली जात आहे. (Arvind Kejriwal Says, What Happens In Kashmir Is Disturbing For Every Indians)

Arvind Kejriwal News
पोलिसांची क्रूरता! तरुणाला इलेक्ट्रिक शाॅक्स दिले, प्रकृती चिंताजनक

आज पुन्हा काश्मिरी पंडित (Kashmiri Pandit) आपली जन्मभूमी सोडण्यासाठी नाईलाजास्तव तयार झाले आहेत. मला समजले आहे, की पंतप्रधान मदत योजनेअंतर्गत ४ हजार ५०० काश्मीर पंडितांना काश्मीरमध्ये वसवण्यात आले. त्यांना नोकरी दिली गेली. काश्मिरमध्येच काम करावे लागले असे त्यांच्याकडून प्रतिज्ञापत्र लिहून घेण्यात आले. आज काश्मिरी पंडित हे प्रतिज्ञापत्र रद्द करण्याची मागणी करित असल्याचे अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) म्हणाले.

Arvind Kejriwal News
...नऊवारी साडी नेसून इव्हेंट करण्याची गरज नाही, नीलम गोऱ्हेंची भाजपवर टीका

आज आम्ही चार मागणी करत आहोत. एक- भाजपच्या केंद्र सरकार देशा समोर काश्मिरी पंडित, हिंदु आणि लष्कराच्या सुरक्षेचा प्लॅन ठेवावे. दोन - हे प्रतिज्ञपत्र रद्द करा. तीन - काश्मिरी पंडितांची प्रत्येक मागणी पूर्ण केली जावी. चार - त्यांना सुरक्षा दिली जावी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.