Arvind Kejriwal: ६ जून ते १३ जुलैदरम्यान केजरीवालांनी दिवसाला तीनवेळा 'असा' आहार घेतला; नायब राज्यपालांचं सचिवांना पत्र

AAP Leader Kejriwal News : दिल्लीचे नायब राज्यपाल व्ही. के. सक्सेना यांनी मुख्य सचिव नरेश कुमार यांना पत्र लिहून मुख्यमंत्री केजरीवाल यांच्या प्रकृतीबद्दल चिंता व्यक्त केली. तसेच, मुख्यमंत्री केजरीवाल औषधे का घेत नाहीत याची माहिती घ्यावी अशी विचारणा नायब राज्यपाल सक्सेना यांनी तिहार तुरुंगाच्या अधिक्षकांच्या अहवालाचा दाखला देत मुख्यसचिवांकडे केली आहे.
Arvind Kejriwal Bail Petetion
Arvind Kejriwal Bail PetetionEsakal
Updated on

नवी दिल्ली: मद्यधोरण प्रकरणात तिहार तुरुंगात असलेले दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या प्रकृती अस्वास्थ्यावरून आप सरकार आणि नायब राज्यपाल यांच्यातील धुसफूस पुन्हा एकदा समोर आली आहे. केजरीवाल तुरुंगातील आहाराच्या नियमांचे पालन करत नसल्याचे पत्र नायब राज्यपालांनी दिल्लीच्या मुख्य सचिवांना पाठविले आहे. तर, रक्तातील शर्करा खालावल्यामुळे मुख्यमंत्री केजरीवाल यांच्या जिवाला धोका निर्माण झाल्याचा आरोप आप सरकारने केला आहे.

दिल्लीचे नायब राज्यपाल व्ही. के. सक्सेना यांनी मुख्य सचिव नरेश कुमार यांना पत्र लिहून मुख्यमंत्री केजरीवाल यांच्या प्रकृतीबद्दल चिंता व्यक्त केली. तसेच, मुख्यमंत्री केजरीवाल औषधे का घेत नाहीत याची माहिती घ्यावी अशी विचारणा नायब राज्यपाल सक्सेना यांनी तिहार तुरुंगाच्या अधिक्षकांच्या अहवालाचा दाखला देत मुख्यसचिवांकडे केली आहे.

मुख्यमंत्री केजरीवाल आहाराचे आणि औषधांचे वेळापत्रक पाळत नसल्याचाही उल्लेख या पत्रात नायब राज्यपालांनी केला आहे. केजरीवाल यांनी ६ जून ते १३ जुलै या कालावधीत दिवसाला तीन वेळा कमी उष्मांकाचा आहार जाणीवपूर्वक घेतला. ते असे का करत आहेत, याबाबत मुख्य सचिवांनी चौकशी करावी, असेही सुचविले आहे. नायब राज्यपाल विनय सक्सेना यांनी राज्य सरकारच्या मुख्य सचिवांना पत्र लिहून मुख्यमंत्री केजरीवाल आहारविषयक नियमांचे पालन करत नसल्याकडे लक्ष वेधल्यानंतर आप सरकारकडून यावर संतप्त प्रतिक्रिया उमटली.

Arvind Kejriwal Bail Petetion
Pooja Khedkar : ''...तेव्हा पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे होते'', दिलीप खेडकरांवरुन होणाऱ्या आरोपांना रामदास कदमांचं उत्तर

आपकडून आगपाखड

दिल्ली सरकारमधील मंत्री आतिशी यांनी या पत्राच्या पार्श्वभूमीवर भाजपवर जोरदार आगपाखड केली आणि मुख्यमंत्री केजरीवाल यांना जीवे मारण्याचे षडयंत्र भाजपकडून रचले जात असल्याचा आरोप केला. केजरीवाल यांच्या रक्तातील साखरेचे प्रमाण तब्बल आठ वेळा ५० पेक्षा कमी झाले आहे. यामुळे ते कोमामध्ये जाण्याची किंवा मेंदूच्या कार्यक्षमतेवर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे, असा दावा मंत्री आतिशी यांनी केला. सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मिळाल्यानंतरही मुख्यमंत्री केजरीवाल अजून तिहार तुरुंगात आहेत. न्यायालयाने त्यांना ईडीने केलेल्या अटकेनंतर जामीन दिला असला तरी सीबीआयने केलेल्या अटकेमुळे ते अद्याप तुरुंगातच आहेत. हे प्रकरण दिल्ली उच्च न्यायालयासमोर असून अद्याप त्यावर निर्णय झालेला नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.