Aam Admi Party: आप' चे नेते देशासाठी स्वतःचा बळी देत आहेत. आमच्या पक्षाचे नेते क्रांतिकारक भगतसिंग यांचे वंशज आहेत आणि हे भाजपने समजून घेतले पाहिजे, असे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आम आदमी पार्टीच्या कार्यकर्ता परिषदेत सांगितले.
'आप' नेत्यांनी ईडीच्या कारवाईबाबत भाजपवर आज जोरदार हल्लाबोल केला. आपचे खासदार राघव चढ्ढा, दिल्ली सरकारच्या महसूल आणि तंत्रशिक्षण मंत्री आतिशी, पर्यावरण मंत्री गोपाल राय आदींचा त्यात समावेश होता.
यादरम्यान 'आप' नेत्यांनी ईडीच्या समन्सबाबत केंद्रावर निशाणा साधला. चढ्ढा म्हणाले ''केजरीवाल सरकारचे काम ठप्प करण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करण्यात आला, पण आजपर्यंत केजरीवाल थांबले नाहीत आणि झुकले नाहीत. केजरीवाल यांच्यावर झालेला गुन्हा इतर कोणताही नेता किंवा पक्ष सहन करू शकला नसता.''
ते म्हणाले ''जेव्हा भाजप आम आदमी पार्टीला तोडू शकली नाही तेव्हा केजरीवाल यांना तुरुंगात पाठवण्याची तयारी सुरू आहे. भाजपने सामान्यांचे जगणे कठीण करून पाप कमावले असून केजरीवाल यांनी सर्वसामान्यांना सुविधा देऊन पुण्य कमावले आहे.''
आतिशी म्हणाल्या, की केजरीवाल यांना अटक झाली तर सरकार तुरुंगातून चालविले जाईल. दिल्लीतील जनतेला केजरीवाल यांना मुख्यमंत्री म्हणून पाहायचे आहे. तेच दिल्लीचे मुख्यमंत्री राहतील. ते कधीही राजीनामा देणार नाहीत. गोपाल राय म्हणाले की, अरविंद केजरीवाल यांनी कामावर मते मागितली आणि दिल्ली जिंकली. देशभर झाडू हे आमचे चिन्ह गेले तर केजरीवाल पंतप्रधान होतील, अशी भीती त्यांना आहे, त्यामुळे आम आदमी पक्षाला रोखण्याचा भाजपचा प्रयत्न आहे, 'आप'च्या नेत्यांना तुरुंगात टाकण्याचे षडयंत्र रचले जात आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.