Arvind Kejriwal: दिल्लीत येणाऱ्या काही दिवसात राजकीय सत्तासंघर्ष पाहायला मिळाला, नवल अजिबात वाटणार नाही. बिहार, झारखंड आता दिल्लीचा नंबर असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. अरविंद केजरीवाल यांच्याविरोधात ईडी कोर्टात गेली आहे. केजरीवाल यांनी ईडीचे समन्स पाचवेळा धुडकावले आहेत. त्यामुळे आता कोर्ट काय निर्णय देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
ईडी कोर्टात गेल्यानंतर आता अरविंद केजरीवाल यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. भाजपने पक्षात येण्याची ऑफर दिल्याचे केजरीवाल म्हणाले. भाजपचं मोठं षडयंत्र आहे. भाजप कितीही षडयंत्र रचू शकतात पण ते अपयशी होतील.
मला भाजपने ऑफर दिली पण मी त्यांना नकार दिला आहे. भाजपमध्ये गेले तर सर्व गुन्हे माफ होतात. आम्ही काय चूक केली. आम्ही शाळा रुग्णालये, रस्ते, बांधत आहोत. गटारांची दुरुस्ती करत आहोत. हा गुन्हा आहे का?, असा सवाल अरविंद केजरीवाल यांनी उपस्थित केला आहे. (Latest Marathi News)
अरविंद केजरीवाल या भाजने दिलेल्या ऑफरच्या दाव्यामुळे अडचणीत देखील येऊ शकतात. दिल्लीतील सरकार पाडण्यासाठी भाजपने सात आप आमदारांना प्रत्येकी 25 कोटी देऊ केल्याच्या आरोप केजरीवाल यांनी केला होता. याबाबत दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून त्यांना नोटीस देखील मिळाली.
ईडीने अबकारी धोरणातील कथित घोटाळ्याच्या संदर्भात चौकशीसाठी हजर राहण्यासाठी, पाच वेळा समन्स बजावूनही केजरीवाल यांच्या पालन न केल्याबद्दल शहराच्या राऊस अव्हेन्यू न्यायालयात धाव घेतली . निर्दोष असल्याचा दावा करताना केजरीवाल आणि आपने भाजपवर 'राजकीय जादूटोणा'चा आरोप केला आहे. आर्थिक गुन्ह्यांची चौकशी करणारी ईडी ही संस्था सध्या भाजपच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारला अहवाल देते. तसेत दिल्ली पोलिसही केंद्र सरकारच्या अखत्यारीत येतात.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.