Aryan Khan Case : आरोपपत्र दाखल करण्यासाठी SIT नं वाढवून मागितली मुदत

आर्यन खान प्रकरणाचा तपास एनसीबीच्या एसआयटीमार्फत केला जात आहे.
aryan khan drug case
aryan khan drug casesakal media
Updated on

मुंबई : आर्यन खान प्रकरणात एक महत्वाची घडामोड समोर आली आहे. नार्कोटिक्स कन्ट्रोल ब्युरोच्या (NCB) विशेष तपास पथकानं (SIT) आरोपपत्र दाखल करण्यासाठी वेळ वाढवून मागवला आहे. कर्डिलिया क्रुझवर झालेल्या ड्रग्ज पार्टीत अनेक सेलिब्रेटी असल्याचं समोर आलं होतं. यामध्ये बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खानचाही समावेश होता. (Aryan Khan drugs case SIT seeks 90 day additional time from Sessions Court to file chargesheet)

NCB च्या SITनं कर्डिलिया क्रुझ ड्रग्ज प्रकरणी २ एप्रिलपर्यंत आरोपपत्र दाखल करायचं होतं. पण एसआयटीनं आरोपपत्र दाखल करण्यासाठी सत्र न्यायालयाकडं आणखी तीन महिन्यांचा अर्थात ९० दिवसांचा अवधी मागितला आहे. एनसीबीच्या एसआयटीनं आज मुंबईच्या सत्र न्यायालयात हा अर्ज दाखल केला आहे.

क्रूझ ड्रग्ज प्रकरणी आतापर्यंत आर्यन खानसह १८ हून अधिक जणांना अटक करण्यात आली आहे. यांपैकी सर्वजणांना सध्या जामिनावर मुक्त करण्यात आलं आहे. एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांनी या प्रकरणी कारवाई केली होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()