दिल्लीचा हवा गुणवत्ता निर्देशांक (AQI) सोमवारी सकाळी 'अत्यंत खराब' श्रेणीत नोंदवला गेला. पूर्वानुमान प्रणाली SAFAR ने याबद्दलचा अहवाल सादर केला आहे. गेल्या आठवड्यात सलग तीन दिवस हवेची गुणवत्ता 'गंभीर श्रेणी'मध्ये होती.
"एअर क्वालिटी अर्ली वॉर्निंग सिस्टीम दिल्ली" ने जारी केलेल्या आकडेवारीनुसार शहरातील एकूण निर्देशांक 326 वर राहिला आहे कारण येत्या काही दिवसांत हवेची गुणवत्ता आणखी खालावणार आहे. "हवेची गुणवत्ता खराब होण्याची शक्यता आहे पण ८ नोव्हेंबर ते ९ नोव्हेंबर या कालावधीत ती अत्यंत खराब श्रेणीत राहील," असे त्यात म्हटले आहे.
0 ते 100 पर्यंत हवा गुणवत्ता निर्देशांक चांगला मानला जातो तर 100 ते 200 पर्यंत तो मध्यम असतो. 200 ते 300 पर्यंत हवेची गुणवत्ता खराब असते आणि 300 ते 400 पर्यंत ती अत्यंत खराब असते असे म्हटले जाते. 400 ते 500 किंवा त्यापेक्षा जास्त हवेची गुणवत्ता गंभीर मानली जाते.
हेही वाचा - का हवे विचारांचे नियम आणि वास्तविक भान !
कोणत्या भागांत निर्देशांक किती?
SAFAR ने जारी केलेल्या आकडेवारीनुसार.
1. नवी दिल्ली - 326
2. राजमहाल - 373
3. इंग्रज बझार - 352
4. सहारसा - 346
5.सेव्हन पगोडा - 337
6. रोहतक - 334
7. बेगुसराय - 334
8. गुरुग्राम - 332
9. बलुरघाट - 332
10. गाझियाबाद - 330
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.