'भाजपला मुस्लिमांची दाढी, मुस्लिमांच्या टोपीपासून धोका दिसत आहे.'
Asaduddin Owaisi News : ऋषी सुनक (Rishi Sunak) यांच्या रूपानं युनायटेड किंगडमला (United Kingdom) ज्या प्रकारे नवा पंतप्रधान मिळालाय, त्यानंतर भारतात त्याची जोरदार चर्चा सुरुय. वास्तविक, ऋषी सुनक हे भारतीय वंशाचे नागरिक असून ब्रिटनचे पहिले पंतप्रधान आहेत. ते हिंदू धर्मातील (Hinduism) आहेत.
ऋषी सुनक पंतप्रधान झाल्यानंतर एआयएमआयएम प्रमुख असदुद्दीन ओवैसी (Asaduddin Owaisi) म्हणाले, मला हिजाब (Hijab) घातलेली मुलगी एक दिवस भारताची पंतप्रधान झालेली पहायला आवडेल, असं त्यांनी नमूद केलंय. भाजपवर हल्लाबोल करताना ओवैसी म्हणाले, 'भाजप (BJP) हलाल मांसाच्या विरोधात आहे, मुस्लिम धर्मातील इतर चालीरीतींच्या विरोधात आहे. भाजप मुस्लिमांच्या अस्मितेच्या विरोधात आहे.'
पंतप्रधान नरेंद्र मोदींवर (Narendra Modi) टीका करत ओवैसी म्हणाले, पंतप्रधान फक्त तोंडानं सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास बोलतात. मात्र, भाजपचा अजेंडा पूर्णपणे वेगळा आहे. त्यांना देशातील बहुलवाद संपवायचा आहे. भाजपला हलाल मांस, मुस्लिमांची (Muslim People) दाढी, मुस्लिमांच्या टोपीपासून धोका दिसतोय. हे लोक मुस्लिमांच्या अस्मितेच्या विरोधात आहेत. भविष्यात एक दिवस हिजाब घातलेली मुलगी देशाची पंतप्रधान व्हावी, अशी माझी इच्छा आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
कर्नाटकातील विजापूरमध्ये महापालिकेच्या चार प्रभागांमध्ये निवडणुका होणार आहेत. 28 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या या निवडणुकीसंदर्भात ओवैसी जनतेला संबोधित करत होते, त्यावेळी त्यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवला. ओवैसी पुढं म्हणाले, 'गेल्या वेळी आम्ही टीआरएस प्रमुख चंद्रशेखर राव यांच्या सांगण्यावरून इथं निवडणूक लढवली नव्हती, त्यावेळी आम्ही जनता दलाचा (एस) प्रचार केला होता. मात्र, यावेळी मी माझ्या पक्षाच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी इथं आलोय.' कर्नाटकातील उडुपी शाळेतून हिजाबबाबत देशात नवा वाद निर्माण झाला होता, इथं विद्यार्थिनींना आतमध्ये हिजाब घालण्यास मनाई करण्यात आली होती. त्यानंतर हे प्रकरण न्यायालयात पोहोचलं आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.