अखंड भारताविषयी बोलू नका, असदुद्दीन ओवैसींचा मोहन भागवतांना सल्ला

'भारतीय सैन्य गस्ती घालणाऱ्या भारताच्या भूभागावर चीनने नियंत्रण मिळवले आहे.'
Asaduddin Owaisi
Asaduddin Owaisiesakal
Updated on

अहमदाबाद : मी मोहन भागवत (Mohan Bhagwat) साहेबांना सांगू इच्छितो, की त्यांनी अखंड भारताविषयी बोलू नये. भारतीय सैन्य गस्ती घालणाऱ्या भारताच्या भूभागावर चीनने नियंत्रण मिळवले आहे. त्यावर बोलावे, असा सल्ला एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी (Asaduddin Owaisi) यांनी भागवत यांना दिला. आज गुरुवारी (ता.१४) अहमदाबाद (Ahmedabad) येथे ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. पुढे ओवैसी म्हणाले, गुजरातमध्ये होणाऱ्या निवडणुकीची तयारीची पाहणी करण्यासाठी दौऱ्यावर आलो आहे. आमचा प्रयत्न आहे, की आम्ही निवडणूक चांगल्या प्रकारे लढावे. ज्यामुळे आमच्या उमेदवारांना विजय मिळेल. (Asaduddin Owaisi Advise Mohan Bhagwat Don't Speaks On Akhand Bharat)

Asaduddin Owaisi
हा पठ्ठ्या नसता तर तो दिल्लीत गेला नसता, गुलाबराव पाटलांचा खासदारांना टोला

निवडणुकीत जनतेचे मुद्दे उपस्थित करणे ही आमची पहिली जबाबदारी असेल, असे ओवैसी म्हणाले. जर तुमच्याकडे गुप्तचर संस्थेचा (IB) अहवाल होता, तर तुम्ही का झोपून होता ? तुम्ही ते बाहेर आणायला हवे होते. मोठ्या प्रमाणावर पोलिस दल तैनात करुन हिंसा थांबवायला हवे होते. तुमचे गुंतागुंतीचे वर्तन लपवण्यासाठी तुम्ही संध्याकाळी कथा सांगायला लागलात.

Asaduddin Owaisi
प्रशांत किशोर यांच्यामुळे गुजरात काँग्रेसमध्ये मतभेद, पक्षाचे नेते नाराज

अशा कथा आता जुन्या झाल्या आहेत, असे म्हणत ओवैसी यांनी राम नवमी मिरवणुकीच्या दरम्यान गुजरातमध्ये झालेल्या हिंसेवर आपले मत व्यक्त केले. जुनचं किती दिवस सांगत बसणार आहात? तुमचे अपयश स्वीकारा, असा टोला त्यांनी गुजरात सरकारला लगावला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()