Gujarat : ओवैसींचं मोदींना थेट चॅलेंज; तीन उमेदवारांची केली घोषणा, हिंदू उमेदवारालाही उतरवलं मैदानात

ओवैसींच्या पक्षानं गुजरातमध्ये हिंदू उमेदवार उभं करण्याची ही पहिलीच वेळ आहे.
Gujarat Assembly Election Asaduddin Owaisi
Gujarat Assembly Election Asaduddin Owaisiesakal
Updated on
Summary

ओवैसींच्या पक्षानं गुजरातमध्ये हिंदू उमेदवार उभं करण्याची ही पहिलीच वेळ आहे.

Gujarat Assembly Election : ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुसलमीनचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी (Asaduddin Owaisi) यांनी आगामी गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी त्यांच्या तीन उमेदवारांची नावं जाहीर केली आहेत. या तीन उमेदवारांमध्ये एका हिंदू उमेदवाराचाही (Hindu Candidates) समावेश आहे.

ओवैसींनी कौशिका बेन परमार नावाच्या महिलेला दानिलिमडा विधानसभा मतदारसंघातून (Danilimda Assembly Constituency) त्यांच्या पक्षाचा उमेदवार म्हणून उमेदवारी दिलीय. ओवैसींच्या पक्षानं गुजरातमध्ये हिंदू उमेदवार उभं करण्याची ही पहिलीच वेळ आहे. कौशिका बेन परमार (Kaushika Parmar) यांच्यासह AIMIM नं जमालपूर-खाडिया विधानसभा मतदारसंघातून माजी आमदार आणि सध्या गुजरात AIMIM प्रदेशाध्यक्ष साबीर काबलीवाला यांना तिकीट दिलं आहे.

Gujarat Assembly Election Asaduddin Owaisi
Sachin Pilot : सचिन पायलटच होणार राजस्थानचे नवे मुख्यमंत्री? आज काँग्रेस आमदारांची महत्वपूर्ण बैठक

अहमदाबादच्या या जागेवरून काँग्रेस पक्षाचे इम्रान खेडावाला सध्या आमदार आहेत. मुस्लिम-दलित बहुसंख्य असलेल्या या जागेवर साबीर काबलीवाला यांना तिकीट देणं ओवैसींच्या पक्षासाठी फायदेशीर ठरण्याती शक्यता आहे.

Gujarat Assembly Election Asaduddin Owaisi
Pinarayi Vijayan : 'लोकांना वाटलं होतं राहुल गांधी देशाचे पंतप्रधान होतील; पण आता त्यांना कळून चुकलंय'

कोण आहेत कौशिका परमार?

कौशिका बेन परमार या AIMIM च्या महिला विंग अहमदाबादच्या विद्यमान अध्यक्षा आहेत. त्यांना ओवैसी यांच्या पक्षानं या वर्षाच्या अखेरीस होणाऱ्या गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी दानिलिमडा मतदारसंघातून उमेदवारी दिलीय. शैलेश परमार हे पूर्व अहमदाबादमधील दानिलिमडातील काँग्रेसचे आमदार आहेत. या विधानसभा मतदारसंघात मुस्लिम आणि दलित मतांची संख्या जास्त आहे. दानिलिमडा विधानसभेची ही जागा अनुसूचित जातीसाठी राखीव आहे.

Gujarat Assembly Election Asaduddin Owaisi
Iran Hijab Row : 'हिजाब'विरोधात इराणी महिला आक्रमक; 700 जणींना अटक, 41 लोकांचा मृत्यू

तर, तिसरे उमेदवार म्हणून वसीम कुरेशी यांना सुरत पूर्व विधानसभा मतदारसंघातून AIMIM चे उमेदवार म्हणून घोषित करण्यात आलं आहे. या विधानसभा मतदारसंघात सध्या भारतीय जनता पक्षाचे अरविंद राणा आमदार आहेत. दरम्यान, गुजरातमध्ये आम आदमी पार्टी आणि ओवैसी यांचा पक्ष पहिल्यांदाच निवडणूक लढवणार आहेत. दोन्ही पक्षांचे नेते गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं गुजरात दौऱ्यावर आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.